शुक्रवार, २ जुलै, २०२१

पट्ट्यांचा आकार आणि लांबी

आज जवळपास २२ वर्षांनी पुन्हा एकदा तोच किंबहुना तसाच प्रसंग मी जगले आणि खुद्कन हसू आलं. म्हटलं लिहावं.

आमचा साखरपुडा अक्का साक्षगंध झाल्यावर एक दिवस मी माझ्या होणाऱ्या सासरच्या घरी गेले, सहज. त्यावेळी मी माझं जुनं मनगटी घड्याळ घातलं होत, कारण तेव्हा मी शिकत होते, एक विद्यार्थिनी होते, त्यामुळे साधं घड्याळ ठीक होत, वेळ दाखवण्याचं काम करत होते ते पुरेसं होत मला आणि सगळ्यानाच. पण माझे सासरे म्हणाले कि आज तुम्ही बाहेर जाता आहात तर नवीन घड्याळ घ्या पहिल्यांदा. "पडत्या फळाची आज्ञा" आम्ही दोघे पोचलो घडाळ्याच्या शो रूम मधे. आम्हाला काय वेळच घालवायचा होता, बघितले खूप सारे आणि शेवटी एक विकत घेतलं. शेवटी मनगटावर घालून बघते तर काय फारच मोठं होत, म्हणजे घड्याळाचा पट्टा लांब लचक होता. त्या दुकानदाराने मग माप घेऊन थोड्या कडया काढून दिल्या आणि पॅक करतांना त्या कड्या घड्याळासोबत ठेवल्या त्या डब्ब्यात, आणि "ह्यांना" म्हणतो कसा, "ह्या कड्या जपून ठेवा, लग्न झाल्यावर लवकरच उपयोगात येतील, मग पट्टा वाढवून घ्यावा लागेल ना?" ई. त्या दुकानदाराला भारीच / भलताच कॉन्फिडन्स होता कि मी लठ्ठ होणारच लग्नानंतर, वा वा.  देवा, मज्जा आली.

आज तसेच भला मोठा लांबच लांब पायाला पट्टा लावून बसले आहे आणि तो काही मावत नाही माझ्या पायांना, फारच मोठा आहे माझ्या पायाच्या आकारा प्रमाणे. आता आली का पंचाईत, कसा कमी करायचा हा पट्टा? असो, सगळ्यात लहान साईझ चा घेऊन पण गडबड झाली आणि मला २२ वर्षांपूर्वीच्या प्रसंगाची आठवण झाली. दोन पट्टे वेगळे आहेत पण यमक जुळलं, डोक्यात सहज आलं, हात सरसरले लिहायला आणि हे लिहिलं. 

#knee-brace #wrist-watch #belt #length-of-belt #size-of-belt #fitting

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...