मला तक्रार हा शब्द वीज मंडळाच्या ऑफिस कडून, रस्त्यावरचे दिवे बदलणाऱ्या / दुरुस्त करणाऱ्या कामगारांकडून, किंवा पिण्याच्या पाण्याचं यंत्र दुरुस्त करायला येणाऱ्या तज्ज्ञाकडून सतत ऐकायला मिळतो. ते नेहेमी म्हणतात "मॅडम तुम्ही तक्रार केली होती". आणि नेहेमी माझं उत्तर एकाच, अहो तक्रार नाही विनंती केली होती, कि वीज गेली आहे, दिवा बंद पडला आहे, पाण्याचं यंत्र सर्व्हिसिन्ग ला आलं आहे ई. आणि इथे वरिष्ठांना कळवणे म्हणजे तक्रारच असते का? नाही, सपशेल नाही. प्रत्येक प्रसंगात माझी तीच रेकॉर्ड पुन्हा पुन्हा वाजवली जाते आणि प्रत्येक वेळी त्या व्यक्ती ना बहुतांशी मी काय म्हणते हे समजलेलंच नसतं.
त्यामुळे
१. हे लिखाण सामाजिक माध्यमांवर लिहिणे हा एक उपाय
२. वरिष्ठांनाच विनंती करायला सुरवात केली मी, अर्थात आधी पण लिहीत होतेच पण आता पुन्हा एकदा सांगते कि हि तक्रार नाही. असो.
केवढा जमीन आसमान चा फरक आहे दोन्ही शब्दांमधे, असं कसं हि माणसं विनंती ला तक्रार म्हणू शकतात, हद्द झाली. हे अगदी साधे मुख्य / मुलभूत मराठी भाषेतले शब्द, आणि हे सगळे कामगार जे असतात ते बहुतांशी मराठी च वाटतात मग त्यांना हा साधा फरक कळू नये म्हणजे आश्चर्यच आहे.
माझी हि धडपड बघून माझी पिल्लं आताशा म्हणायला लागली आहेत, मम्मा काय फरक पडतो, म्हणू दे त्यांना तक्रार, तू विनंती केली आहेस ना, मग बास, झालं, संपल, तक्रारीचा सूर सोडून दे, हि विनंती. आई शपथ, काय हसलोय आम्ही तिघे परवाच. माझे दोघे सल्लागार अफलातून आहेत हे निश्चित, फार बारीक लक्ष असतं माझ्या कडे आणि मी थोडीशी जरी अस्वस्थ आढळले कि लगेच त्यांचं चपराक उत्तर / निरसन तय्यार असतंच. सहीच ना.
#complaint #request #difference #not-irreplaceable-words #workers #phone-operators #boss #my-kids #counselors
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा