कोणासमोर व्यक्त करायचं - ५
तुमचं तुम्हालाच कळेल अनुभवातून कोणासमोर, कधी आणि किती व्यक्त व्हायचे ते. सहज, माझी आई म्हणते तिच्या भजनात "अनुभवातून आत्म प्रचिती...". करत गेलात कि मार्ग स्वच्छ दिसायला लागतात, त्यामुळे करा, सतत.
सुरवात करतांना कागदावर व्यक्त व्हा, पुन्हा पुन्हा वाचा, कदाचित सुरवातीला पुन्हा वाचतांना बदल करावेसे वाटतील, करा. कारण हे सगळं फक्त तुमच्या एकट्या साठी चालू आहे, हे लक्षात ठेवा.
रेकॉर्ड करण्या आधी, गरज वाटल्यास आरश्या समोर उभे राहून बोलून बघा. किंवा रेकॉर्ड करा, ऐका, आवडल्यास स्टोर करा आणि शेअर करा.
फायनल व्हर्जन शेअर करण्याआधी तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमच्या घरच्या टॉमी असेल तर त्याच्याशी बोला, बोलता बोलता अजून भन्नाट शब्द आठवतील, वेगळ्या प्रकारे कसं मांडता येईल हे लक्षात येईल ई.
शेजारचे मित्र / मैत्रिणी असतील तर त्यांच्याशी बोला, जपून पण मोकळे व्हा, फार उपयुक्त असा हा तरणोपाय आहे, कारण माणसांशी बोलल्यावर प्रतिक्रिया मिळतात ज्या आरश्या समोर आणि टॉमीशी बोलून जे मिळतात त्या पेक्षा वेगळ्या असतात.
माझ्या दृष्टीने संगणकासारखा दुसरा सख्खा मित्र नाहीच, कारण तो तुम्हाला कधीच जज करत नाही / चुकीचं घेत नाही. त्यामुळे स्वतःच्या लॅपटॉप वर मस्त फोल्डर तय्यार करा आणि सुरु व्हा. ते शब्द शेअर करत नाही तो वर फक्त तुम्हालाच दिसणार आहेत, बरोबर?
आई, बाबा, नातेवाईक (तानेवाईक नाही बरं का) ई. शी पण चर्चा करता येईल आणि व्यक्त होणं सोप्प जाईल. चला तर मग इतके सगळे विविध प्रकार आहेत, व्यक्ती आहेत, (आरसा कुत्रा शेजारी संगणक मित्र आई बाबा नातेवाईक ई.) सुरु व्हा आणि परमानंद उपभोगा आणि एखाद्याचं जीवन जरी मार्गी लागलं तुमच्या व्यक्त होण्याच्या शैली मुळे, तर मग काय विचारता. अप्रतिम होईल, नाही का? अर्थात तो मार्गी लागलेला व्यक्ती तुम्हाला त्याच श्रेय देवो अथवा न देवो, आपण तर हे सगळं स्वतः साठीच करतो आहे, बास तर मग.
https://drpreetimulay.blogspot.com/2021/08/blog-post_20.html
Also find me on Medium.com https://link.medium.com/VyP5yiGmqib
Listen to this story on YouTube : https://youtu.be/Mi6VWPCy0bs
#speak-up #in-front-of-many #many-choices #friends #neighbors #pet #mom #dad #enjoy
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा