रविवार, १ ऑगस्ट, २०२१

व्यक्त व्हा - ४ कोणासाठी?

 व्यक्त व्हा - ४ कोणासाठी?

१. स्वतः साठी आणि २. दुसऱ्यांसाठी

व्यक्त व्हा - १ मधे नमूद केल्याप्रमाणे स्वतःसाठी व्यक्त व्हा, कारण हलकं फुलकं वाटत. डोक्यात, मनात कचरा साठून राहत नाही आणि त्याची दुर्गंधी पसरत नाहीच. सदोदित टवटवीत राहण्याचा सुलभ मार्ग म्हणजे व्यक्त होणं.

  • आपण दिवसातनं अनेक विध उपक्रम / गोष्टी करतो, त्या टिपून ठेवा
  • भूतकाळातल्या गोड / आठवणीना उजाळा द्या हळूहळू आणि मांडा
  • घर ते ऑफिस ह्या मार्गावरच्या आठवणी मांडा
  • सध्याच्या WFH ची विविधता आणि तुमचे अनुभव सांगा
  • गुंतवणुकीचे मार्ग सांगा
  • विविध पदार्थ / कृती सगळे मांडा
  • प्रत्येक कला महत्वाची, त्या बद्दल लिहा
  • छंदांबद्दल कळवा etc


मागे एकदा मी लिहिल्याप्रमाणे दूध-केळ, दूध-पोहे अश्या साध्या कृती पण तुमच्या शैलीत टाकण्याची सोय टेकनॉलॉजि ने दिली आहे आता. त्यामुळे फक्त सुरवात करा. बास.

हे झालं स्वतःसाठी व्यक्त होणं, स्वतः बद्दल व्यक्त होणं, स्वतः चे लपलेले गुण समोर आणणं ई. हे सगळं केल्यामुळे मग बघा कसा बदल घडेल तुमच्या मधे न-कळत / सहज.

एवढं केलं तरी खूप आहे, कारण स्वतः साठी करता करता हे जेव्हा सगळं जगासमोर येईल तेव्हा कोणाला न कोणाला तरी त्याचा भरपूर उपयोग होईल, आज नाही तर उद्या. त्याची वाट बघायची नाहीच, आपण फक्त करत राहायचं. दुसऱ्यांसाठी उभं राहतो खजाना माहितीचा, ज्ञानाचा आणि प्रेरित करण्याचा अश्यानेच.

पुन्हा एकदा एक छोटीशी गोष्ट येथे देते. हि गोष्ट मी एका मराठी वृत्तपत्रात वाचली होती. एक आजी गुढघे दुखीने त्रस्त होत्या, हाडांच्या तज्ञाकडे गेल्या, त्याने रीतसर उपचार सुरु केले. १५ दिवसांनी यायला सांगितलं आजींना. गेल्या १५ दिवसांनी आणि काहीही बदल नव्हता. मग गोळ्या बदलून दिल्या गेल्या, १५ दिवसांनी पुनश्य हरी ओम. मग आजी वैतागल्या. डॉक्टर म्हटले आजी तुम्ही सूर्य नमस्कार करा. आजीनी सुरु केले आणि अंथरूण धरलं. थोडसं बरं वाटल्यावर आजीनी पुन्हा सूर्य नमस्कार करायला सुरवात केली पण ह्या वेळी त्यांनी जेव्हा "मित्राय नमः" म्हटलं तेव्हा अचानक त्यांना त्यांचा एक मित्र / मैत्रीण आठवले, आणि सिलसिला सुरु झाला, इतक्या वर्षातले शेजारी, मैत्रिणी, ई. आठवले.  केव्हा ११ सूर्य नमस्कार आनंदाने पूर्ण झाले लक्षातच आले नाही.
गुढघे दुखी इतिहासात जमा झाली होती. ह्या अनुभवाबद्दल त्या व्यक्त झाल्या आणि अगणित जीवांना फायदा झाला, अनेक प्रकारे. हे आहे व्यक्त होण्याचं महत्व.

छोटे का मोठे प्रसंग / अनुभव, उपयोगी का नाही, काय वाटेल लोकांना, कोणी वाचतील का? ई. कशाचीही फिकीर न करता पुढे चला, ताबडतोब,
आज,आत्ता. ओके. 

Listen to this story on YouTube: https://youtu.be/yB5e4muyXG8 

Find me on Medium.com https://link.medium.com/WRDi6ZFkqib

#importance-of-friends #speak-up #write #note-down #publish #for-self #for-others #peaceful #motivational #importance-of-others

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...