रविवार, १ ऑगस्ट, २०२१

व्यक्त व्हा - ३ कधी ?

 व्यक्त व्हा - ३ कधी ?


अहो कधीही, वेळ काळ बघण्याची गरज नाहीच, कारण व्यक्त व्हा -२ मधे सांगितल्याप्रमाणे रेकॉर्ड करून ठेवा, नमूद करून ठेवा सवडीप्रमाणे आणि मग गरज पडल्यास शेअर करा, त्यामुळे, कधी हा प्रश्नच उद्भवत नाही. किंवा रेकॉर्ड करायचा मूड आला कि ताबडतोब व्यक्त व्हा, त्याचे अनेकविध फायदे आहेत, आणि एक दिवस एक वेळ ठरवा आणि पोस्ट करा. बास. म्हणजे तुमच्या वाचकांना पण त्या वेळेची सवय होईल, ते तुमचे विचार / गोष्ट ऐकण्या करता वाट बघतील.

अर्थात तुमच्या हातातील महत्वाची कामं बाजूला ठेवून व्यक्त होत बसू नका हो, नाहीतर गडबड होईल. त्यामुळे मनात विचार येतील तेव्हा टिपून ठेवा कुठे तरी मग त्याला सजवा, नटवा, रंगरंगोटी करा आणि मग पोस्ट करा.

ऑफिस ची, घरातली, समाजाची कामं करत करत, नवनवीन गोष्टी टिपत टिपत व्यक्त होत राहा. आपल्याला सगळ्याच गोष्टींचा समतोल साधायचा आहे. माझ्या दृष्टीने टेकनॉलॉजिचा उपयोग करून व्यक्त होणं हि पण एक आज घडीला उपयुक्त अशी समाजसेवाच आहे. त्यामुळे कागद पेन / पेन्सिल, गुगल-बाबा, ई. काहीही तय्यार ठेवाच आणि नेहेमीच व्यक्त होत राहा.   

#speak-up #talk-out #share-thoughts #google-services #pen #paper #record-audio #record-video #post-on-social-media #relax #whenever-possible #always-grasp #always-note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...