व्यक्त व्हा - 2 कसे ?
टेकनॉलॉजि वापरून. आताशा तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्यक्त होणं सहज सोप्प झालं आहे.
१. आधी डोक्यात गोष्ट / मुद्दे तयार ठेवायचे
२. रेकॉर्ड ऑडिओ नावाची सर्विस असते बहुतेक मोबाईल मधे, ती वापरून आपल्या डोक्यातील विचार रेकॉर्ड करायचे
३. साजेसं नाव द्यायचं आणि स्टोअर करायचं.
४. हवं असल्यास बाकीच्यांशी शेअर करायचं.
हेच मुद्दे मायक्रोसॉफ्ट वर्ड नावाचं सॉफ्टवेअर वापरून लिहायचं, जर इंग्लिश भाषेत असेल तर. जर मराठी किंवा अजून कुठली बोली भाषा असेल तर गुगल ची ऑनलाईन सर्विस वापरायची आणि सगळे मुद्दे सॉफ्ट कॉपी मधे उतरवायचे.
त्यानंतर भरपूर स्क्रीन रेकॉर्डिंग चे सॉफ्टवेअर आहेत, ते वापरून विडिओ रेकॉर्ड करायचा म्हणजे आपल्या कडे एक आठवण राहते किंवा दुसऱ्यांबरोबर शेअर करता येते सहज. रेकॉर्ड करण्याकरता https://screencast-o-matic.com/ ह्या संकेत स्थळाचा / वेब साईट चा उपयोग सहज करता येतो. किंवा मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट नावाचं एक सोप्प सॉफ्टवेअर आहे त्यात पण रेकॉर्डिंग होत.
आता पर्यंत आपण ऑडिओ आणि विडिओ कसा तय्यार करून व्यक्त व्हायचं हे बघितलं.
त्याशिवाय विविध सोशल मीडिया साईट्स वर तुम्ही लिहिलेलं प्रदर्शित करू शकता, जसे कि फेसबुक, ब्लॉग साईट, https://medium.com/ आणि बरेच असे.
एकदा तुम्ही विचार जुळवून लिहायला, टिपायला, रेकॉर्ड करायला सुरवात केली कि तुमच्याकडे भरपूर गोष्टींचा साठा तय्यार होईल. मग तो तुम्ही एखाद्या वर्तमान पत्राला पण पाठवू शकता. त्यांना आवडलं, भावलं तर ते छापतील देखील. आणि एकदा जर का तुम्हाला तंत्रज्ञान वापरून व्यक्त होण्याची सवय लागली, कि लोक वाचून प्रतिक्रिया देतात, आणि आपल्याला अजून व्यक्त व्हावसं वाटत. किंबहुना आपण मग अजून हिरीरीने लिहायला / विचार मांडायला सुरवात करतो, व्यस्त राहतो आणि मग वेगवेगळे मार्ग सुचत जातात अजून विविध तंत्रज्ञान वापरायचे, व्यक्त व्हायचे, फायद्याचे ई. पॉडकास्ट हा पण मग एक प्रकार वापरू शकतो. थोडक्यात पॉडकास्ट म्हणजे मुलाखत घेणे, प्रश्न विचारणे, ऑडिओ फाईल असते आणि खूप प्रसिद्ध प्रकार आहे सध्याच्या टेकनॉलॉजि चा.
तर मंडळी, स्वतःचे कलेक्शन करून तर बघा, कुठल्याही फॉर्म मधे चालतील पण टेकनॉलॉजि वापरून व्यक्त व्हा, साठवून ठेऊ नकाच, बघा कशी मज्जा येते ते. चला आजच सुरु करा, जो पहिला विचार येईल त्या बरोबर.
https://youtu.be/qDdBodQwPow
#speak-up #in-audio-form #record-audio #mobile-service #mobile-software #mobile-app #Microsoft-word #Microsoft-powerpoint #medium.com #screencast-o-matic.com #screen-recording #podcast #newspaper #collection-of-thoughts #useful-for-others #motivational
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा