अगदी लहान असतांना त्या वेळेच्या प्रथेनुसार वर्षभराचे पापड, सांडगे, कुरडया ई. सगळं उन्हाळ्यात घरीच होत असे. आमच्या कडे आजूबाजूच्या शेजारणी, मावशी ई. यायच्या. आमचे वाळवणं तय्यार झालं कि मग आई त्यांच्या कडे जाऊन देवाण घेवाण होत असे, "एकमेका साह्य करू ...." असं काहीस. मज्जा म्हणजे मज्जा असायची. आमच्या टोळीला दोन महत्वाची कामं सोपवली जात असे. एक म्हणजे ते पापड उलटसुलट करणे वाळले कि अंदाज घेऊन दुपारच्या वेळी आणि संध्याकाळी संपूर्ण वाळले कि मग काढून डब्ब्यात शिस्तीत ठेवणे. आम्ही एका पायावर तय्यार. अगदी कच्चा पापडाचा गोळा / लाटी फस्त करण्यापासून आमची जय्यत तय्यारी असायचीच. मग काय आयतं कोलीत हातात मिळालं कि पापड उलटसुलट करण्याच्या निमित्याने अर्धे अधिक आमच्या पोटात. आई शप्पथ ते अर्धे कच्चे पापड काय लागायचे चविष्ट. अहाहा. आज हे पापड पुराण का? सांगते.
काल मी पापडाच्या लाटण्याने लाटलेली पोळी आधी पोटभर बघितली, चाखली आणि यथेच्छ खाल्ली. प्रत्येक पिठाप्रमाणे खरं तर लाटणं असतं म्हणजे त्याची जाडी, उंची, रुंदी, त्यावरचं डिझाईन ई. कारण प्रत्येक पिठातली सिंग्धता, चिवटपणा, लवचिकपणा आणि त्यापासून तय्यार होणार पदार्थ त्याचं शिजवणं, टिकवणं आणि एकंदरीत संपूर्ण प्रक्रियाच भिन्न, त्याचमुळे. त्यामुळे ज्याला लागणार त्याला तेच लाटणं वापरणं हितावहः. एकच लाटण वापरून सर्वच पदार्थ करता येणं अशक्य. जसे कि प्रत्येका साठी प्रत्येकाला एकच तरणोपाय कामी येत नाहीच कधी, व्याधी एक पण औषधे अनेक. त्यामुळेच जरी पापडाच्या लाटण्याने केलेली पोळी गोजिरवाणी दिसली तरी ती लाटायला, शिजायला आणि चवीला हवी तशी नव्हती बरं का मंडळी.
मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१
सवंगडी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा