एका अनोख्या गिफ्ट बद्दल सांगणार आहे आज मी. सर्वांच्याच आयुष्यात येणारे काही टप्पे महत्वाचे असतात आणि आज फक्त मी काही ठळक वाढदिवसांबद्दल बोलते आहे. आधी फक्त साठी, पासष्टी, सत्तरी, सहस्त्र चंद्र दर्शन ई. वाढदिवसांना महत्व होत, किंबहुना सर्वांसमक्ष साजरे होत, मोठा सोहोळाच जणू. त्यानंतर कधी हे निश्चित माहित नाही पण बहुतेक सॉफ्टवेअर तय्यार करण्यासाठी माणसांची ये-जा दुसऱ्या देशात सुरु झाली तेव्हा पासून असेल कदाचित गोजिरवाणे सोळा, अठरा, एकवीस, चाळीस, पन्नास अश्या वाढदिवसांना जास्त महत्व आलं आणि टिकलं देखील. अर्थात अर्धशतक गाठणं सध्याच्या वेगळ्या वेगवान धावपळीच्या काळात पण एक खास बात आहेच. ह्या सगळ्या बदलांमुळे मग अश्या खास दिवसांसाठी काय उपहार / भेट द्यायची ह्या कडे सगळ्यांचं लक्ष वेधलं. मी पण प्रवाह पतित झालेच. पण एक सांगा मंडळी मुलाच्या पन्नासाव्या वाढ दिवसादिवशी त्याच्या आई वडिलांकडून शुभेच्छा मिळण्याचं भाग्य किती जणांना लाभतं? माझ्या दृष्टीने फार कमी. त्यात कुटुंब मोठं असलं, आणि त्यात लहान्या मुलाचा पन्नासावा म्हणजे तर दुधात साखर, केशर, बदाम, पिस्ते.... आणि हे न मागता मिळालेलं गिफ्टच नाही तर फार मोठे आशीर्वाद आहेत. अजून काय पाहिजे. ह्या पुढे सगळ्या मटेरिलिस्टिक / भौतिकवादी भेटवस्तू अगदी नगण्य. जे असे अहोभाग्य घेऊन जन्माला नाही आले त्यांना विचार म्हणजे समजेल / उमगेल. अर्थात ते आई बाबा मग प्रत्यक्ष शुभेच्छा / आशीर्वाद द्यायला नसतील समोर अगदी वाढदिवसाच्या दिवशी, पण ते आहेत हिच फार मोठी अनोखी भेट आहे. ते आई बाबा, ती मुलं असेच अनेक प्रसंग एकत्र साजरे करोत अनेक वर्ष, ठणठणीत प्रकृती सोबत हीच ईशचरणी प्रार्थना.
शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१
अहोभाग्य
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
So very true. Who else would best understand the value of parents' blessings on their 50th birthday but those who never got those precious blessings..or those who never will..
उत्तर द्याहटवाYeah, but those who are getting it and will get it, lets enjoy with them, isnt it, as someone said "lets look at what we have". Might be because of those who dont have the others will understand the importance of these blessings more, right?
उत्तर द्याहटवा