आज पर्यंत मी अनेकविध लोकांच्या संपर्कात आले आहे, नोकरी निमित्य, शेजारी पाजारी राहून, प्रवासात, मुलांमुळे, परदेशी वास्तव्यामुळे देखील. अनेक वेळा मला असं आढळलं आहे कि माझ्या संपर्कात असलेल्यांपैकी काही पुरुष मंडळी त्यांच्या जबाबदाऱ्यांमुळे किंवा अजून काही कारणास्तव एकटे राहिले आहेत आणि हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. ह्या समाजात आणि अख्ख उभं आयुष्य एकटं राहणं म्हणजे फारच मोठं आव्हान आहे आणि मी ते फार जवळून अनुभवलं आहे. पण अर्थात किंचित प्रमाणात पुरुषांना / मुलांना अगदी थोडसं सोप्प आहे त्या मानाने एकटं राहणं. मी अगदी फारच कमी प्रमाणात मुली एकट्या राहिलेल्या बघितल्या आहेत. मला एवढ्यातच अजून एका अवलियाला भेटण्याचा योग आला. तिच्या लहान भावाचं लग्न झालं, मुलगी झाली आणि ती अवघी ४ महिन्यांची असतांना त्या लहान भावाचा अपघात झाला आणि लेक पोरकी झाली. मग आत्यानेच एकटी राहून त्या ४ महिन्याच्या मुलीचे संगोपन केले, तिला मोठी / जबाबदार आणि उत्कृष्ट नागरिक घडवले आणि शिवाय तिच्या स्वतःच्या आईची काळजी पण घेतली. म्हणजे एका वेळी तीन पिढ्या सांभाळल्या, आई, स्वतः आणि भाची. हे काय कमी होत तर एका भल्या मोठ्या कंपनीत अतिशय मोठ्या हुद्द्यावर आत्या काम करते आहे. म्हणजे भावाचं लहान बाळ सांभाळत, नोकरीत सुद्धा वाहून देऊन, आईची काळजी करत, स्वतःचे सुख / आयुष्य बाजूला सारून ध्येय गाठणं म्हणजे अतिशय आव्हानात्मकच, नाही का?
धडधाकट माणसांना, सर्व सुखसोयींनी समृद्ध अश्या ना देखील असं वागणं जमत नाहीच. सतत तक्रारी, कुरबुरी, काय नाही ह्याची यादी, उणे दुणे काढत दिवसांमागून दिवस जात असतात नेहेमी. आणि ह्या बघा. त्यांना अगदी सहज शक्य होत जबाबदारी झटकणं. पण नाही तसं त्यांनी अजिबात केलं नाही. शिवाय इतक्या साध्या तितक्याच करारी, उत्कृष्ट राहणीमान, जबाबदार, बहारदार व्यक्तिमत्व आणि बोलायला पद्धतशीर, शिस्तीत.... मी तर त्यांना बघून, ऐकून, निरखून प्रेमातच पडले. स्वतःच्या मुलांसाठी अनेक पालक मागे पुढे बघतात, बोलतात, आरडाओरडा करतात. पण दुसऱ्याचं मुलं सांभाळणं ते देखील आयुष्यभर आणि घडवायचं शिवाय ते देखील मुलीला, मला त्या आत्या भाचीला बघून प्रेमात पडावं का त्यांची स्तुती करावी का सांत्वन का धीर द्यावा का शाबासकी हे समजलंच नाही, अर्थात त्या पलीकडे गेल्या आहेत त्या. धन्य धन्य झाले ह्या समाजात इतक्या खंबीर पणे स्वतःला उभं ठेवून, भाचीला उभं करणाऱ्या "झाशीच्या राणीला" भेटून. माझा साष्टांग दंडवत त्या आत्याला. त्या दोघींना सतत उदंड, सुदृढ, आनंदी, आयुष्य आणि आरोग्य लाभो हीच ईशचरणी मनापासून प्रार्थना.
शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१
अजून एक अवलिया
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा