गेली अनेक वर्षांची माझी एक मैत्रीण आहे, म्हणजे माझ्या वरच्या मजल्यावर राहते आणि तिचं एक खास वैशिष्ट्य आहे. शाळकरी मुलं मुली ते आजी आजोबांपर्यंत सगळेच जण अंगठी / अंगठ्या परिधान करतात हे आपल्याला माहित आहेच, पण दाही बोटात मिळून एखादी किंवा जास्तीत जास्त दोन, बरोबर. पण ह्या माझ्या मैत्रिणीची खासियत होती कारण ती दाही बोटात अंगठ्या घालायची. अर्थात दुरून बघितलं तर तसंच दिसायचं. पण जेव्हा आमची चांगली ओळख झाली आणि मी निरखून बघितलं तेव्हा समजलं कि दही बोटात दहा पेक्षा जास्त अंगठ्या घालते ती, म्हणजे एका बोटात एका पेक्षा जास्त. माझी दाही बोट तोंडात गेली ते बघून, असो.
मी खरं तर लग्न झाल्यावरच खऱ्या अर्थाने अंगठी घालायला सुरवात केली होती, पण मग माझी दोन्ही बाळं लहान असतांना पुन्हा त्याला स्वल्प विराम लागला, मग नोकरीत फटाफट टाईप करता यावं म्हणून अजून एक थांबा, असं करता करता खूप काळ गेला मधे पण मग मी सुरवात केली विविध अंगठ्या काढून घालायला आणि हे लिहायला सुचलं जेव्हा माझाच हात मी बघितला सहज, अर्थात बघितला गेला सहज. करंगळीतली अंगठी माझ्या बालपणीची आजीच्या प्रेमाने आणि आशिर्वदाने परिपूर्ण अशी. त्यानंतर साक्षगंध दिवशी परिधान केलेली दुसऱ्या बोटात. माझी बाळं झाली तेव्हा आईने दिलेली मधल्या बोटात मावली. लग्नांच्या दहाव्या वाढदिवसादिवशी दिलेली त्या पुढच्या बोटात आणि मग मधेच अंगठ्यात घालायची हवा आली होती त्यामुळे मी घेतलेली अशी अंगठी. माझ्याच पाच बोटातल्या पण पाच जणांनी, पाच विविध वेळेला, अनोख्या प्रसंगी दिलेल्या अश्या आठवणी आहेत त्या. पूर्णपणे विजोड, एकाची सर दुसऱ्याला नाहीच आणि असू पण शकत नाही, पण टप्प्या टप्प्याने मिळवलेल्या / दिलेल्या पण माझ्या साठी मनापासून गुंफलेल्या त्या अंनन्यसाधारण महत्वाच्या अश्या आहेत. महत्वाच्या ह्याच्यासाठी देखील कारण त्या फक्त मलाच नाही तर बघणाऱ्यांना पण खूप सुंदर दृश्य दाखवतात, अनुभव देतात आणि मला प्रचंड आठवणी सहित आशीर्वाद आणि सहवास देशील. अहाहा.
मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१
अनन्यसाधारण महत्व
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
Very touchingly portrayed!
उत्तर द्याहटवा