बुधवार, १ डिसेंबर, २०२१

आहे मनोहर तरी

"And Pine for what is not"  हे  इंग्लिश मधील समानार्थी वाक्य आहे " आहे मनोहर तरी" , असेल. माझ्या, फक्त माझ्या दृष्टीने ह्या मराठी ओळीचा अर्थ असा आहे कि व्यावसायिक म्हणून एखादा व्यक्ती अतिशय प्रसिद्ध असतो, हवा-हवासा असतो, वेगळी छाप असते पण तोच व्यक्ती कदाचित स्वतःच्या कुटुंबासोबत अगदी वेगळा असू शकतो, कधी कधी असतो देखील. किंवा उलट पण सहज शक्य आहे. सरतेशेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती, नाही का?

काही कुटुंबामधे मनोहर नावाचा पदार्थ होतो, किंवा त्या पदार्थाचं टोपणनाव मनोहर असं आहे. मनोहर म्हणजे पोळीचा चिवडा, कुटके, तुकडे, आणि बरीच नाव आहेत. मनोहर हे नाव का पडलं असेल, त्यावर सहज सुचलेलं मांडते आहे. पोळीच्या चिवड्याचा परमानंद उपभोगायचा असेल तर आणि मुळात तो शिळ्या पोळ्यांचाच होतो, आदल्या दिवशी च्या उरलेल्या किंवा सकाळच्या उरलेल्या. पोळ्या शिळ्या नसतील तर बारीक तुकडे किंवा चुरा करणं अवघडच. आणि शिवाय फोडणी झाली कि मोकळा पण नरम देखील झाला पाहिजे ना. त्या मुळेच सरते शेवटी ज्यांना आवडतो त्यांना चविष्ट लागत असला तरी तो पदार्थ असतो शिळ्या, उरलेल्याच, कुस्करलेल्याच पोळ्यांचाच, नाही का?. झणझणीत फोडणी, साग्रसंगीत कांदे, दही / लिंबू, साखर, भरपूर कोथिंबीर, आणि चिमूटभर प्रेम हे मसाले मिसळले कि जगावेगळी चव येते, पण........ अगदी चपराख मनोहर सारखं, दोन चेहेरे, लपवा छपवी पण हवी हवी शी.  

एकाद्या बड्या संस्थेत काम करणं, एखाद्या दिग्गज कुटुंबात राहणं, उच्च जागी स्थित असलेल्या माणसासोबत काम करणं ई. काहीही किंवा कुठेही "आहे मनोहर तरी" हा अनुभव येतो बरेचदा. अर्थात "दुरून डोंगर साजरे" हे म्हण हि तितकीच योग्य आहे. प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्याने परिधान केलेला चष्मा फक्त त्याचा असतो, त्यामुळे त्यातून त्याला जे जग बघायला मिळत, किंबहुना तो बघू इच्छितो तसंच ते दिसत. त्यामुळे कोणीच शंभर टक्के नेहेमीच बरोबर / योग्य नसतं, आपण बघू / घेऊ तसं आहे. त्यामुळे योग्य चष्मा निवडा आणि निवडत राहा. "घराचा पौष्टिक नाश्ता, आईच्या हातचा" vs "शिळ्या पोळ्यांचे तुकडे" काय निवडायचं ते ठरवा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...