बुधवार, १ डिसेंबर, २०२१

अस्तर

अगदी अगदी काल पर्यंत मला अस्तर ह्या शब्दाची ओळख फक्त एवढीच होती कि जरीच्या ब्लॉउज च्या कपड्याला, किंवा सुळसुळीत ड्रेस च्या कपड्याला आतून पातळ लावलेलं कापड. बास. त्या व्यतिरिक्त काही माहित नव्हतं. आणि त्या मागचं शास्त्रीय कारण म्हणजे भरजरी किंवा कॉटन सोडून बाकी सगळ्या कपड्यांना शिवण बसत नाही जर अस्तर चा आधार दिला नाही तर. किंवा एखाद कापड फारच पातळ असेल तरी देखील एक जोड असावी मजबूत शिलाई साठी म्हणून अस्तर. अस्तर अगदीच तलमली, मऊ, पातळ कापडाचं असतं जेणे करून तो ड्रेस किंवा ब्लाउज परिधान केल्यावर टोचू नये आणि एक समाधान वाटावं म्हणून, ते भरजरी महागडं कापड जास्त भारदस्त दिसावं आणि टिकावं म्हणून देखील.

अजुन एक महत्वाचा ड्रेस जो घरी सहसा वापरला जातो तो म्हणजे गाऊन / कप्तान. बहुतांशी असं आढळलंय कि गाऊन चा परकर हा एक खास सोबती असतो. पहिल्यांदाच बघण्यात आलं कि गाऊन ला पण अस्तर लावलंय. कदाचित रात्रभर मऊ अस्तराच्या सानिध्यात स्वस्थ झोप लागावी म्हणून असेल, किंवा फक्त एक हलका फुलका गाऊन चढवला कि झालं, अश्या सोयीसाठी असेल. आधी नाही तर फार मोठी यादी असेल हा ड्रेस घालण्या आधी, आणि बऱ्याच घरी दररोज चा मामला.  परकर आणि गाऊन हे दोन कपडे वेगळे शोधा, रंगसंगती लक्षात घ्या, घाला, धुवा, बांधा ई.  कारणं माहित नाहीत पण मला भावली ती कल्पना. सध्या सगळंच रेड़ीमेड उपलब्ध आहे मग हे का नाही?

ज्याला हि अतिशय उपयुक्त आणि सुबक सुंदर कल्पना सुचली तो कदाचित ह्या अस्तरासारखा असेल, अदृश्य अस्तित्व असलेला, भक्कम साथ देणारा / जोडणारा, हळुवार मऊ स्पर्शाची जाणीव करून देणारा आणि जो बोचरा नाहीच असा. अहाहा. फार पटला मला त्याचा / तिचा स्वभाव आणि कल्पना. असेच जर सगळे जगले तर जग कित्ती सुंदर होईल ना सर्वत्र. साधी कल्पना केली तरी अस्तराचा अनन्य साधारण महत्व जाणवलं प्रकर्षाने. चला तर मग अस्तर रुपी वास्तव ठेवण्याचा प्रयत्न करू या नेहेमीच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...