रविवार, २ जानेवारी, २०२२

जडण घडण

माझ्या "त्या" दिवसातलं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे माझे बाबा मला अगदी एक "बेटा" म्हणून नकळत वाढवत होते तर आई "अगं उद्या तुला सासरी जायचं आहे..." ऐकवत होती आणि मी अशी बहरत होते, सहज. काहीही म्हणजे काहीही असो, मुहूर्त नको, खास कारण नको, ह्या दोन पद्धती ठऱलेल्याच. मला पण मग काहीच दिवसात लक्षात आलं होत कधी काय कुठलं वाक्य नचुकता माझ्या पुढ्यात येणार ते. आईच्या दृष्टीने मी "त्या" बाहेरच्या / माहित नसलेल्या घरासाठीच सगळं शिकत होते, आत्मसात करत होते, किंबहुना करायलाच हवं होत आणि ते देखील उत्कृष्ट रित्या. मग "त्या" घरी जाण्याचा आला की प्रसंग. गेले, तिथली होता होता पुन्हा तश्याच पद्धतीचं कानावर आलं, "आमच्या घरी असं असतं .... तुझ्या आईकडे .... ", तेव्हा सासऱ्यांच्या घरात वास्तव्य होत, त्यांनतर नवऱ्याच्या घरी. मग म्हणजे दोन्ही घर माझीच का .........?

मी जेव्हा आईच्या भूमिकेत शिरले कदाचीत काळानुरूप ती वाक्य उच्चारली नाही जात आहेत पण "आता काय थोड्याच दिवसात मुलीचं शिक्षण होऊन ती भुर्रकन उडून जाणार, तिच्या पंखात बळ येणार ई" नकळत बोललं जातंय.

किंवा उद्या मी कामानिमित्य गावाला जाणार, मग तेथून आठ एक दिवसात पुन्हा पुण्याला ई.

असंच का बोललं जात?, किंवा मनात येत फक्त जाण्याबद्दल?. मी कामानिमित्य गावाच्या वास्तव्यात कसे प्रत्येक क्षण अनुभवणार, स्मृती निर्माण करणार ई. ना का नाही महत्व दिल जात?. जाण्यावरच भर का? अशी जडण घडण का? माझी लेक आता माझ्या कडे अजून ३ वर्ष राहणार हे का नाही उभं राहत माझ्या ओठांवर सतत? हा एक महत्वाचा मुद्दा सध्या गेले ४ महिने मी नवीन पालकांना समजावून सांगते आहे. कारण सध्या मी एक नवीन तांत्रिक शिक्षण संस्था उभं करण्याचं ध्येय उराशी बाळगून जगले आहे आणि ते प्रत्यक्षात आणतांना शेकडो पालकांशी संवाद साधता आला. अपेक्षा करते कि त्यात / पालकांना समजावण्यात  काही अंशी सफल होईन आणि माझ्यात देखील बदल दिसतील. मी आणि माझ्या आई-बाबांनी  बघितलं ह्या सगळ्या कडे तसे कदाचित नवीन पिढीतले आई-बाबा, मुलं नाही बघणार पण काही सांगता येत नाही, बोटावर मोजण्या इतके असले तर त्यांना ह्या विचारांचा फायदा नक्की होईल असं वाटत मला.  "हे विश्वची माझे घर..." असं राहणं उत्तम, ह्या जगाच्या शर्यतीत आनंदाने आणि उत्साहाने टिकण्याकरिता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...