रविवार, २३ जानेवारी, २०२२

अंदाज, कल्पना आणि जाणीव

अगदी नेहेमी प्रमाणे तो आज देखील माझ्या समोर उभा ठाकला, दत्त म्हणून आणि न कळत खुणावून गेला देखील. आणि मी, अगदी माझ्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे पहिले काही क्षण गैरसमज करण्यातच घालवले. कदाचित एक ठराविक / टिपिकल भारतीय आई म्हणून असेल कदाचित. असो. पण अगदी पट्टाकिनी दुसऱ्या क्षणीच मला एक वेगळा कोन, एक वेगळा किरण नजरेस पडला आणि मला प्रचंड आनंद झाला कि सरतेशेवटी मला समजलं कि त्याला काय म्हणायचं आहे ते, काय संदेश पोचवायचा होता ते.

तर त्याच असं झालं कि माझ्या मोबाईल वर सगळ्यांसारखा गुगल पे अँप आहे. मी ते सगळीकडे वापरते आणि त्या मुळे असेल कदाचित पण तो मला बरेच छोटे छोटे मेसेजेस पाठवत असतो. आज पण तसेच झाले, आला एक मेसेज. त्यात थोडक्यात असं लिहिलं होत कि "महिन्याचा खर्च संपूर्ण कुटुंबासोबत वाटा / शेअर करा". आणि एक चौकोनी कुटुंबाचा फोटो त्या सोबत होता. म्हटलं शिकण्याच्या वयात मुलांनी घराचा खर्च का शेअर करायचा, वाटून घ्यायचा. आई वडिलांचं काम आहे ते, मुलांनी मस्त बिनधास्त शिकावं, मग नोकरी करून स्थिर स्थावर व्हावं आणि त्यांचा त्याचा खर्च सांभाळावा, बास. पण "नाण्याला जश्या दोन बाजू असतात" त्या प्रमाणे मला अचानक दुसरी बाजू जास्त प्रकर्षाने उभी ठाकली. त्यात असं दिसलं / नजरेस पडलं कि मुलांनी शिकण्याच्या वयात खर्च पैश्याच्या स्वरूपात वाटून घेण्यास नाही सांगत आहे गुगल पे, पण संपूर्ण कुटुंबाला कल्पना हवी कि महिन्याला घरात कुठे, कसा आणि किती खर्च होतो. एक जाणीव / जागरूकता म्हणून, बास. म्हणजे ते जेव्हा त्यांचं स्वतःच खर्च करण्याचं वेळापत्रक सुरु करतील तेव्हा ते काही अंश तय्यार असतील. गुगल पे नी हि सुविधा उपलब्ध करून दिली, त्या बद्दल मेसेज दिला आणि कळवलं त्या बद्दल शतशः धन्यवाद. बऱ्याच कुटुंबात कल्पना नसते महिन्याला घर चालवणं म्हणजे काय ते? ह्या छोट्याश्या कृतीने माझ्या दृष्टीने आई बाबांबद्दल एक अजून छोटीशी आदराची भुमीका वाटेल, बाजाराची सद्य स्थिती समजेल, एकमेकांच्या अजून जवळ येत येईल / जवळून ओळखता येईल, आत्मविश्वास वाढेल, पारदर्शकता जास्त व्यवस्थित टिकवता येईल ई. आणि अनेक फायदे मला दिसले. छान वाटलं. ज्याच्या डोक्यातून हि उत्कृष्ट कल्पना आली आहे त्याला, त्यांना शतशः धन्यवाद, अगदी मनापासून. आणि हो सुरवातीला सांगितल्या प्रमाणे हा नवीन विषय उभा ठाकला हो माझ्या समोर आणि हे माझे छोटेखानी विचार मांडण्याची संधी देऊन गेला. अर्थात थोडी महाविद्यालयात जाणारी मुलं पण गुगल पे साधारणतः वापरतातच, गरजेचंच आहे सध्याच्या जगात, त्यामुळे त्यांना घरातल्या सगळ्या / जमेल तेवढ्या छोट्या छोट्या उपक्रमात सहभागी करून घेणं उत्तम. अर्थात कोणी ह्या नवीन जाहिरात कुल्पती / युक्ती  म्हणेल, आणि असेल देखील, ह्या मुळे काही जण सगळे व्यवहार गुगल पे वापरून करतील म्हणजे महिन्याच्या शेवटी एक यादी वर्गीकरण केलेली सगळयांना दिसेल आणि त्यावरून पुढील महिन्याच्या खर्चाचा अंदाज येईल आणि कमी-जास्त फेरफार लागलेच तर सुचतील / करता येतील. काही का असेना, सर्वांनी एकत्र येण्याचा हा मार्ग भावाला माझ्या मनाला. असेच एकमेकांशी नेहेमी जोडलेले पारदर्शक राहा आणि आनंद उपभोगा.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...