गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२

साम्य

७ फेब्रुवारी ला दरवर्षी जगभरात एक अत्याधुनिक सण साजरा करण्यास सुरवात होते, तो एक आठवडा चालतो आणि सर्वच वर्गात त्याचा आनंद उपभोगला जातोच. अगदी आपल्या नेहेमीच्या सणांप्रमाणे जसे कि दिवाळी, संक्रांत ई. हे सण पण बरेच आठवडे साजरे केले जातात सर्वत्र, भारतात. दिवाळी ते देव दिवाळी ह्या कालावधीत कारण माहेरवाशिणींना त्यांच्या सासरचं सगळं सांभाळून भाऊबिजेच्याच दिवशी येता येईलच असे नाही, म्हणून हि वाखाणण्यासारखी विचारपूर्वक केलेली सोय.  तेच संक्रांतीच देखील. रथसप्तमीपर्यंत आपल्या सोईनुसार हळदीकुंकू करता येत.

अगदी त्याच धर्तीवर मला हा अत्याधुनिक सण आखलेला दिसतो, ७ ला सुरु होतो, वैविध्य प्रकारचे प्रत्येक दिवस घेऊन, आपापल्या सवडीनुसार, सोईनुसार मस्त झकास एन्जॉय करण्या करता आणि संपूर्ण एक आठवडा चालतो तो, १४ तारखेपर्यंत.

ह्या दोन सणांमधे मला फारच साम्य आढळलं म्हणून मला सांगड घालता आली अनुकथेच्या स्वरूपात.
त्यामुळे लोक हो जमल्यास आठवडाभर आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत वेळ व्यतीत करा, नाहीतरी काही दिवस आठवड्यातले त्या खास ठरलेल्या दिवस प्रमाणे आणि अगदीच जर जमलं नाही तर एखाद दिवस नक्की, कारण ह्याची तय्यारी आणि माहिती / पूर्वसूचना जगभरातील लोकांना असतेच आणि ती देखील वर्षभरापूर्वी मिळालेली, त्यामुळे हे सहज साध्य होण्यासारखं आहेच. आणि हो सगळ्याच प्रकारच्या जाहिराती सतत वाचायला, ऐकायला, बघायला मिळतातच ह्या सणाविषयी, थोडक्यात काय कोणीच तुम्हाला हे विसरू देत नाही, येऊ घातलेल्या सणाविषयी. मस्त एन्जॉय करा, एक्सप्रेस कराच, नवीन पदार्थ चाखा / खिलवा, असंख्य प्रकारच्या भेट वस्तू उपलब्ध आहेत त्या घ्या दोघांसाठी, कारण नेहेमीच "कृतीने शब्दांपेक्षा जास्त व्यक्त करता / होता येत".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...