मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

आशिरमय गट

माझी दहावी आटोपली आणि मी तुकड्या तुकड्यात घरीच लहान शाळकरी मुलांना शिकवायला सुरवात केली. इंजिनियर ची परीक्षा झाली आणि पुर्णवेळ नोकरी स्विकारली आणि ती घौडदौड सुरु राहिली त्यानंतर, अर्थातच विविध ठिकाणी, विविध हुद्द्यावर आणि मुलांना सांभाळत. ह्या माझ्या छोटेखानी प्रवासात मी अनेक प्रकारच्या मुली पारखल्या, किंबहुना अभ्यासल्या गेल्या सहज जे कानावर पडलं त्यानुसारच फक्त, कधीही म्हणजे कधीही फार खोदायला गेले नाही. अनेकविध कारणं आहेतच कि मुली का नोकरी करतात, कधी सोडतात ई. एक गट असा आढळला कि
काहीही झालं तरी शेवटपर्यंत काम करणारच, दुसरा ज्यात काम करणं / कमावणं अतिशय महत्वाचं आहे गरजेचंच आहे, तिसरा कधीच नोकरी ना केलेला असा, ज्या घरीच फार आनंदी आहेत, चौथा ज्यात मुलं छान मोठ्ठी झाल्यावर सुरवात केलेल्या, पाचवा फक्त ऐकिव गट आहे ज्यांना मी कधीच बघितलं नाही ज्यात करोडोंची नोकरी सोडून काही वेगळंच सुरु केलं आहे, सहावा पण नाही कधी संपर्कात आला ज्यात अचानक झाल्यासारखं वाटतं एका क्षेत्रातून दुसरी कडे कूच केली आहे, सातवा ज्यात उत्तम सुरु असलेली नोकरी सोडून समाज कार्य आरंभलं आहे ई. अजूनही बरेच गट असतील देखील पण मला एवढे आढळले सध्या. हो, ह्या सगळ्यांची आपआपली भरपूर कारणं असतील देखील कि त्या सगळ्या त्याच गटात का आहेत, जे मला जाणून घ्यायला नकोत, किंवा गरज नाहीच.  एक अजून गट म्हणता येईल कि नाही हे माहित नाही पण त्यात फार कमी जणी आहेत ज्यांना समाजाच्या दृष्टीने फार लवकर निवृत्ती घ्यायची आहे / घेतली आहे, अगदी कदाचित बोटावर मोजता येतील एवढ्याच, अर्थात माझ्या संपर्कात आलेल्या / आढळलेल्या / ऐकलेल्या / वाचलेल्या.  त्यांच्या घरी कदाचित समाधान असेल, पाठबळ असेल, पुरेसा संच असेल किंवा असं भासत असेल, कुठलेही कारण नसेल, तब्बेतीच्या कुरबुरी असतील छोट्याश्या, बदल हवा असेल, थांबायची इच्छा झाली असेल किंवा अजून काही. मग अश्या मुलींना / स्त्रियांना काय म्हणाल? त्यांना खूप मोठा आशिर्वाद लाभला आहे?, का त्यांना सद्बुद्धी मिळाली आहे, का थांबल्याशिवाय त्यांना कळणार नाहीच पुढे काय करायचं ते, का त्यांना उमगलं आहे कि सरते शेवटी किती पैसा पुरेसा असतो? पैशासाठीच का काम करायचं? किती वर्ष? आता सगळ्याच गोष्टी / वयोमानच काही वर्ष आधीच होऊ घातलंय, उदाहरणार्थ: चष्मा म्हणजे चाळीशी असा समज होता आधी आणि आता?, निवृत्ती म्हणजे ६५, घर निवृत्ती नंतर येणाऱ्या पैशानी आणि आता नोकरी लागल्या लागल्या ताबडतोब, पैसे आणि किमती वस्तू हाताळणं बहुतांशी स्वतः कमवायला लागल्यावरच, आणि आत्ता अगदी शाळकरी वयातच. मग निवृत्ती का नाही आधी घेता येत जर सहज शक्य असेल तर? घेतलीच समजा मग त्यानंतर काय? ह्या गटात कोणी आहेत का? त्यांनी काय काय केलयं? काय काय करावं? सोप्प असतं का? पैसे मिळणार नाहीत दर महिन्याला, धावपळ थांबेल, रोजनिशी पूर्णपणे बदलेल आणि बरेच काही, चालेल का? ह्या सगळ्यांची उत्तर त्यातनं गेल्यावरच समजतील का?

आऊट लायर म्हणजे बाह्यस्थ किंवा पठडी बाहेरचा, अश्यांचा टिकाव लागतो का? हा छोटासा गट ह्या आऊट लायर संद्येचा भाग समजावा का? उत्तरं मिळतील का? शोधावी का? कुठून सुरवात करावी, स्वतः पासून का दुसऱ्या पासून? दुसरा समाधानी का असमाधानी, हे कसं मांडायचं? जशी जशी उत्तर मिळत जातील तशी तशी मी तुमच्या समोर मांडत जाईनच, पण त्या आधी कोणाला काही कल्पना असेल तर निश्चित कळवणे हि विनंती. इतका हा गट दुर्मिळ असेल, इतके प्रचंड आशीर्वाद मिळाले असतील, विचारांची दिशा स्फटिका सारखी स्वच्छ असेल असं वाटलं नव्हतं हो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...