इंग्लिश भाषेत बोलायचं झालं तर शॉक म्हणजे झटका. ह्या झटक्याचे अनेक प्रकार असतात आणि तीव्रता पण कमी जास्त असते किंवा भासते म्हणायला हरकत नाही. समोरचा जसा हा झटका घेईल त्यावर अवलूंबून आहे. आपल्या जरी तो फार छोटा आणि साधा वाटत असला तरी देखील पुढच्याला तो तापदायक ठरू शकतोच, कारण त्याची ताकद, पचवण्याची आणि स्वीकारण्याची पद्धत ई. आणि बरीच कारणं आहेतच. काही जण शॉक देतात कधी तो दिला जातो किंवा मिळतो, कळत - नकळत. काहीही म्हणा छोटीशी उणीव, धक्का किंवा नुकसान देऊन जातो हे निश्चित. तेव्हा आपल्या हातात जेव्हा असतं तेव्हा काळजी घ्या. प्रथेनुसार शॉक अगदी जवळच्याच व्यक्ती ला बसतो हो, जे तुमच्या आजूबाजूला सतत वावरत असतात, मदत करत असतात, तुमचे असतात, तुम्ही त्यांच्यावर अवलंबून असता कारण त्यांच्याशिवाय जगणं फार मुश्किल असतं, जसे कि ते एक भाग आहेत तुमच्या जीवनाचा, अविभाज्य भाग. मग अश्यांना शॉक देतांना जरा जपा मंडळी. अगदी बरोबर हेरलत, मी पदोपदी आपण जे मोबाईल फोन आणि आपला लॅपटॉप चार्जे करतो ना त्याबद्दल खुणावते आहे तुम्हाला. आधी दोन टोकं आधी जोडा आणि मग तो विजेचा स्वीच दाबा. तुम्हाला जगावेगळी नेहेमीची घाई आहे त्यामुळे त्या बापड्यांना का सततचा झटका. अहो हो, प्लग लावून, मान वाकडी करून एका बाजूला फोन वर बोलता बोलता खटपट करून मग ते दुसरं टोक लॅपटॉप ला जोडायचं सोडा. क्षणभर वेळ ठेवा / काढा त्या महत्वाच्या वस्तू साठी ज्याच्याशिवाय पान देखील हालत नाही कोणाचाच आणि सध्याच्या परिस्थितीत. एक क्षणभर लॅपटॉप च्या ऐवजी तुम्ही आहात त्या जागी आणि सातत्याने तुम्हाला असे छोटेसे झटके अनुभवायला मिळाले तर चालेल? अर्थात नाही, मग हि बाळगलेली सवय का? मोडा आधी, आत्ता आणि बघा हळूहळू कसे आनंदाचे झटके अनुभवायला मिळतात ते.
लस घेण्याआधी कशी पूर्वतय्यारी करतात, कापसाचा गोळा फिरवतात, म्हणजे मानसिक तय्यारी होते आणि छोटी मुंगी चावते जणू, पण हेच जर न बोळा फिरवता टोचलं तर? जास्त दुखेल शारीरिक आणि मानसिक दृष्टीने. तसेच स्वतःची मुलं जेव्हा १० /१२ ई. अतिमहत्वाच्या उंबरठ्यावर उभी असतात, परीक्षा देतात, नक्की माहित असतं कधी चांगली बातमी कळणार आहे ते, अंदाज असतो बातमीचा, त्यामुळे पूर्वतय्यारी अशी देखील असते, धक्का बसत नाही मोठा हो. जरी लॅपटॉप आणि मोबाईल चार्जे करणं उपयोगी असतं तरी देखील तो करण्याची एक शिस्तबद्ध पद्धत असते हो मंडळी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा