आज माझ्या घरापासून ते कचेरीपर्यतं पोचताना दुतर्फा जी सिमेंटची जंगलं तय्यार झाली आहेत त्यांच्या कडे सहज लक्ष गेलं आणि प्रकर्षाने सज्जा अक्का बाल्कनी कडे आकर्षित झालं. कारणं ? बरीच आहेत. काही इमारतींना एकावर एक बाल्कनी आहेत, काहींना इकडे तिकडे आहेत. पण आहेत, हे महत्वाचं. खरं पाहिलं तर बाल्कनी का असते घराला, तर माझ्या मते:
- अंगणाची उणीव थोडक्यात भरून काढायला
- आकाशाखाली मोकळी आपली जागा असावी म्हणून
- संपूर्ण घर बंद असतं, तसं बांधलं असतं, पण बाल्कनी हि एक फार सुंदर मोकळी जागा
- बाल्कनी हि कधीच अडगळीची जागा नसतेच पण .....
- हिरवळ डोळ्यांना गारवा देते, त्यासाठी हि खास जागा राखीव असते
- एक छोटेखानी भाग नक्की मोकळा असावा म्हणून
- आणि अशी बरीच इतर कारणं आहेत
अगदी तस्सेच आयुष्यात प्रत्येकाने एक कवाड मोकळं ठेवलं तर? काय मज्जा येईल त्या व्यक्तीला आणि इतरांना देखील जे त्याच्या सोबत राहतात, काम करतात. सगळं बंद खोल्यांमधे घुसमटत किंवा दबून राहण्यापेक्षा आकाशा खाली मोकळं, आजूबाजूला हिरवळ, स्वच्छ ताजी हवा, असंख्य पक्षी, झाडं, बागडणारी लहान मुलं, आजी-आजोबा, वैविध्य गाड्या-त्यांचे रंग-आकार-प्रकार ई. आणि बरेच काही दिसेल हो. आणि ह्या सगळ्यांमुळे स्पष्ट विचार, आचार, मैत्र, आनंद, परमानंद आणि शांतात लाभेल हे वेगळंच, नाही का. मग तपासून बघा आत, आहे ना एक बाल्कनी आणि उघडी हो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा