ह्या नवीन दिवसांनी काय काय म्हणजे काय कायच शिकवावं, कमाल आहे. अहो मला तर माझ्या कॉलेज मधल्या वाचनालयाची लिफ्ट आठवली अचानक, ह्या अद्भुत छोटेखानी प्रसंगामुळे. आणि लिफ्ट मधे असलेल्या स्टील च्या बार / दांडा हो, त्याचा पण एक वेगळा सदुपयोग करता येतो हे देखील समजलं, नव्याने आणि पोटभर म्हणजे पोटभर हसले. म्हटलं एकटीने का हसायचे, सगळे मिळून हसुयात. म्हणून हा पंक्ती प्रपंच. तर त्याचं असं झालं, आम्ही नुकतेच आमच्या जुन्या फ्लॅट मधे पुन्हा राहायला आलोत. सगळेच शेजारी चांगलेच ओळखीचे आणि काळजी करणारे. सगळेच काही ना काही खाऊ घालत आहेतच आल्यापासून. त्यात एक आज्जी राहतात आमच्या वर. त्यांनी आवर्जून मला थांबवून सांगितलं कि लवकरच जेव्हा जमेल तेव्हा मी तुला ना एक पदार्थ खाऊ घालणार आहे. आधी मी नको म्हटलं पण त्या प्रेमळ आजी काही ऐकत नव्हत्या, म्हणून होकार दिला. बास मग काय उत्साही आजी लागल्या कामाला आणि एक दिवस मला फोन आला, "घरी पोचलीस का? मी काही तरी केलं आहे, ते पाठवते. लिफ्ट समोर ये. "मी येते वर घ्यायला" इति मी, "फक्त लिफ्ट समोर ये, बास", आज्जीच त्या, ऐकणार थोडी होत्या. काही मिनिटात लिफ्ट आली आणि पाहते तर काय आरश्याला आणि उभं राहतांना पकडण्यासाठी जो स्टील चा बार दिला आहे त्याला एक छोटीशी पिशवी दिमाखात लटकत होती आणि त्यातून एक डब्बा खुणावत होता. मी ते बघूनच इतकी हसायला सुरवात केली कि ज्याचं नाव ते. मग आजींना फोन केला, तर म्हणतात कश्या "अगं ह्या नवीन दिवसात आम्हाला वरिष्ठ नागरीकांना एकमेकांकडे जाता येत नव्हतं, पण दुसऱ्याच्या हातची चव पण चाखायची होती, त्यामुळे मग हा असा उपाय / तरणोपाय शोधून काढला आम्ही. तुझ्या शेजारच्या काकू ना किराणा / सामान मी मागवून द्यायची ऑनलाईन आणि त्यांच्या मजल्याचं बटन दाबायचं, त्या उतरवून घ्यायच्या सामान. एक मेकांकडे न जाता, बाहेर न पडता काम सुकर होत होतं". अहाहा म्हणजे अहाहाच. माझ्या वाचनालयात फक्त पुस्तकं जातात-येतात लिफ्ट ने दिमाखात, वा, त्याची प्रकर्षाने आठवण झाली मला. नेहेमीकरता लक्षात राहील असा छोटेखानी प्रसंग म्हणून टिपून ठेवला, एवढंच. सोसायटी मधल्या लिफ्ट चा असा पण उपयोग होऊ शकतो हे माझ्या कधीच डोक्यात नाही आलं, आणि ते मी प्रत्यक्ष अचानक अनुभवलं, भन्नाट.
गुरुवार, ३ मार्च, २०२२
लिफ्ट चा सदुपयोग
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा