बुधवार, ३० मार्च, २०२२

पेशल मसाला चाई

आज मला सकाळी आयता चहाचा कप हातात मिळाला. तो फारच पेशल चहा होता, मसालेदार अगदी. भरपूर मसाला, वेगळा अनोखा स्वाद, मज्जा आली. एक एक घोट, अजून एक घोट पिउन बघता बघता चहा कधी संपला ते समजलं देखील नाही हो, कारण प्रत्येक घोट मसाल्याची लज्जत आणखी वृद्धिंगत करत होता. अहाहा च. पहिल्या घोटात समजलं कि आलं मस्त टाकलंय भरपूर आणि ते देखील किसून हो. किसलेलं आलं, ठेचून घातलेलं आलं, वाळलेलं आलं, तुकडा आल्याचा असं अनेकविध प्रकारे चहा तय्यार केला जातो, जशी दिवसाची सुरवात होईल तशी, वेळ असेल तसा, घाई कितपत आहे, आलं कश्या स्थितीत आहे, आणि बरेच काही. काही घोट घेतल्यावर अजुन एक नवीन स्वाद किंवा काहीतरी वेगळं घातलंय हे लक्षात आलं माझ्या जिभेला. खात्री करण्यासाठी पुन्हा एक-दोन घोट घेतले आणि निश्चित उमगलं त्या मागचं रहस्य / गुपित. मग पुन्हा हा रहस्यमय घटक आला कोठून हे विचार करता करता आणखीन दोन घोट उतरले घशा खालून. पण काही उमगेना. मग मी काल काय काय पदार्थ केले गेले होते ते आठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आलं कि काल कढी करण्यासाठी आलं आणि लसूण किसून ठेवलं होतं मावशींनी. मग मी अगदी जेवायला बसायच्या वेळी कढी फोडणीला टाकली.  काल यथेच्छ जेवण झालं आणि आज चहा हातात मिळाला कारण मी थोडीशी आवरासावर करत होते. मावशींची सदाची घाई, पळापळ त्यामुळे त्या किसणीला फक्त पाणी दाखवलं होतं मावशींनी हे स्पष्ट झालं. पण त्यामुळे अस्सल मसालेदार, "ना भूतो ना भविष्यती" असा चाखायला मिळाला ना मला. मस्तच. मज्जा आली, खूप वेगळ्या नोट वर / कौर्ड वर दिवसाची सुरवात झाली आणि ह्या अनुकथेचा जन्म देखील मसालेदार. वा. मावशीचे आभार.   "ताक हि फुंकून प्यावे" अगदी तसे आता किसणी पण धुवून घ्यावी लागणार वापरायच्या आधी किंवा वास तरी घ्यावा लागणार अंदाज येण्यासाठी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...