बुधवार, ३० मार्च, २०२२

दमछाक

माझी एक तरुण सहपाठी आहे. गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतो एकाच विभागात. नॉर्मल दिवस होते तेव्हा दररोज न चुकता डब्बा एकत्र खात होतो, अधेमधे कॅन्टीन ला जायचो फडशा पडायला, कधी कधी कोणी काही खास करून आणायचो, गप्पा आणि हशा पिकायचा तो थेट आसमंतालाच भिडायचा. ह्या माझ्या तरुण मैत्रिणीच्या अनेक अद्वितीय आणि असाधारण अश्या खास गोष्टी होत्या. आता होत्याच म्हणायला हव्यात कारण इतक्यात त्या कुठे लोप पावल्यात कोणास ठाऊक, किंबहुना माहिती आहे मला आणि हाच ह्या अनुकथेचा विषय आहे. त्याच्या खास गोष्टींपैकी काही म्हणजे चविष्ट पास्ता आणि केळाच्या पुऱ्या, एकसारखी बडबड आणि असंख्य प्रश्न, इतके कि मला गप्प करायच्या. बघा मंडळी, मला, आणि गप्प म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेलच कि किती प्रश्नांची सरबत्ती असेल. वैविध्य विषयांवर गप्पा मारून आणि हसून पुरेवाट होत असे. हरवले ते दिवस, पण असो कोणीही कधीही असं कचेरीत उत्साहाने एन्जॉय केलं नसेलच. आम्ही भन्नाटच होतो आणि आहोत. चार पाच वर्ष मिळाली आम्हाला सलग एन्जॉय करायला माझ्या मते १३-१७. मी परमेश्वराला मनापासून धन्यवाद देते, कारणं अनेक आहेत. माझी PhD आजच्या मानाने सोप्पी झाली असं आता म्हणता येईल. आता हि माझी तरुण सखी PhD + पूर्ण वेळ झोकून देऊन ऑफिस च काम + घर + पिल्लू + ऍडमिशन च काम + प्रमोशन च्या विविध गोष्टी + पेपर्स लिहिणं + आई-बाबा + सासरचे ई. आणि बरेच काही उत्साहात करतात ना कि दही बोटं तोंडात. ह्याचंच पिल्लू घरी असतं, फक्त इमॅजिन करा तो कित्ती प्रश्न विचारात असेल, शेवटी उतरलं असेलच ना त्यात देखील. म्हणजे मज्जाच मज्जा आणि एक अजून काम. देवा.  दमछाक होत असेल पण कधी म्हणजे कधीच त्या दाखवत नाहीत, चेहेऱ्यावर कधीच ते उमटत नाही, पण हो जराशी चाल बदलली आहे सध्या, सतत संशोधनाचाच  / कामाचा विचार करत असतात हे दिसतं चालतांना पण, तेवढा देखील वेळ वाया जाऊ देत नाही, किंबहुना सदुपयोगाचं करतात त्या वेळेचा. अहाहा च.

सद्य स्थितीत अवघड झालयं पेपर्स लिहिणं, ते पट्टाकिनी अकॅसेप्ट होणं, त्यात गाईड एका टोकाला, ह्या दुसऱ्या, खरोखर कष्ट आहेत, सचोटी आहे, आणि कमाल आहे खरंच. कसं सगळं करतात कोणास ठाऊक. अगदी मनापासून सलाम, अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो, त्यांना १० हत्तीचं बळं मिळो हि ईशचरणी प्रार्थना. मी ह्या माझ्या चिरतरुण मैत्रिणीला इतक्या वर्षांपासून अगदी जवळून बघितलं आहे, ओळखते त्यामुळे फार प्रकर्षाने जाणवतं. बाकी समस्त तरुण मैत्रिणी ज्या ह्या काळात PhD करत आहेत आणि बाकी डोलारा सांभाळत आहेत त्यांना सुद्धा माझा मानाचा मुजरा. धन्य धन्य आहेत सगळ्याच. "अश्या मैत्रिणी सभोवती असती आणिक स्फूर्ती देऊनी जाती".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...