सोमवार, २८ मार्च, २०२२

शाई

माझ्या लहानपणीपासून एकच प्रकारचं पेन ठाऊक होत मला / आम्हाला, शाईचं, निब असलेलं. ते एक दररोज काम असायचं, शाळेची तय्यारीतलं एक, शाई भरणे. मस्त प्रकार असायचा तो, पेन उघडायचा, शाईचं दौत उघडायचं, मग ड्रॉपर ने शाई भरायची. कधी ती सांडायची, कधी डाग लागायचे, विचारू नका, हात, फडकं, टेबल . बरबटयाच. शाळेच्या गणवेशावर उडायची शाई, वह्या पुस्तकांना, दप्तराला लागायचे डाग जर पेन गळत असला तर. पेन गळत असला तर हाताची बोट पण बघण्यासारखी होत असतं. काय दृश्य होतं ते, सर्वत्र सारखच, सगळ्यांच्या एक तर बोटाला, दप्तराला, वाहिला, पुस्तकाला शाईचे डाग असणारच. अर्थात "दाग अच्छे है", हे ब्रीद वाक्य तेव्हा प्रचलित नव्हतं हे आम्हाला माहितच नव्हतं. आम्ही ते डाग मस्त मिरवले, उपभोगले अहाहा , सलग अनेक वर्ष. त्यानंतर आले कि हे-ते पेन पण शाईच्या पेनाची जागा शाबूत राहिली, अढळ अशी. आज ह्या सगळ्याची का आठवण आली, सांगते. अहो एक दिग्गज कंपनीचं पेन मला कोणी तरी भेट म्हणून दिल, ते मी अत्यानंदाने वापरायला सुरवात केली, आणि लिहिता लिहिता अचानक मला माझ्या बोटांना काही तरी वेगळं जाणवलं, बघते तर काय, शाई लागली माझ्या हाताला, कित्येक वर्षांनी. अगदी शाळेत गेल्यासारखं जाणवलं, ते बेंच आठवले, ते सवंगडी देखील. इतकं महागडं पेन, भेट ती देखील पण शाई बाहेर आल्यामुळे बाहार आली, आठवणी जाग्या झाल्या, पुन्हा विद्यार्थी झाल्यासारखं वाटलं आणि १० हत्तीचं बळ देऊन गेलं. असं वाटत होत कि तो हात तसाच जपून ठेवावा अनेक दिवस. पण मग फोटो फॉर्म मधे जपला आणि हे लिहायला घेतलं. धन्यवाद पेन आणि असाच अधेमधे शाई बाहेर टाक म्हणजे माझ्या बोटांचं सार्थक झाल्यासारखं वाटेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...