सोमवार, २८ मार्च, २०२२

स्पा

आवडीपेक्षा आराम हि स्पा मागची कल्पना, संकल्पना आहे, होती आणि राहणार. दररोज च्या धावपळीनंतर स्पा म्हणजे स्वर्गच, पर्वणीच आणि अवर्णीय सुख. शारीरिक, मानसिक स्वास्थ्याकरिता स्पा अत्यावश्यक आहेच. रिलॅक्स, निवांत, आणि तणाव मुक्त अनुभवायचं असेल तर स्पा योग्य पर्याय. थोडंस महाग आहे पण डॉक्टर कडे चकरा आणि औषध घेण्यापेक्षा कैक पटीने मस्त. आजकाल दगदग, रस्ते, खड्डे, कामाचा प्रचंड डोंगर, वैविध्यता, मल्टिटास्किंग आणि बऱ्याच अश्या गोष्टींमुळे स्पा तरणोपाय ठरतोय बऱ्याच वेळी. आज पर्यंत मी फक्त माणसांसाठी स्पा हे अनुभवलं होत, चार पायांच्या मित्रांसाठी पण स्पा हे ऐकलं होत / वाचलं होत, पण आज तर मी उडालेच, चारचाकी साठी पण स्पा, अहाहा. अप्रतिम आयडियाची कल्पना आहे. काय विचारता. आवडलं मला तो बोर्ड बघूनच. गाडी चकचकीत होत असेल पण खरंच गरज आहे का? संकल्पना काय, तुम्ही करताय काय? असो. ह्या नंतर अजून कुठल्या निर्जीव वस्तू ला स्पा लागणार आहे बघू यात. "नवनवीन कल्पना येति आणि हास्य फुलवुनी जाती". 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...