शनिवार, १९ मार्च, २०२२

सुगंध, स्वाद, चव

माझ्या लहानपणीपासून मी एक जगावेगळा सुगंध अनुभवाला आहे अनेक वर्ष सातत्याने. त्या काळी माझे बाबा दाढी करण्याकरता एक विशिष्ट साबण वापरायचे. ते एका छोटेखानी डब्बीत यायचं. दर वेळी ते पाण्याचा स्पर्श झाला कि फेस निर्माण होऊन दाढी केली जात असे. त्या संपूर्ण प्रक्रियेत इतका भन्नाट घरभर सुगंध पसरत असे. बाबांनी पण तोच साबण वापरला आणि त्या साबणाने पण कित्येक वर्ष तोच अप्रतिम सुगंध टिकवला, अहाहा.

अजूनही मला बरेचदा भास होतो आणि अचानक तो च अप्रतिम सुगंध मी अनुभवते काही क्षण.

अजुनक एक मनाला भावणारा सुगंध म्हणजे पहिल्या पावसाच्या ओल्या मातीचा. त्याच वर्णन शब्दात होऊच शकत नाही. तो सुगंध इतका प्रेरणादायी असतो, किंबहुना तो सुगंध आला कि ताबडतोब माती चाखायची इच्छा होते, इतकी वर्ष होऊन देखील. काय ताकद आहे त्या सुगंधात बघा, अहाहा. ज्याचा सुगंध मनाला भिडतो, भावतो तो पदार्थ / जिन्नस ताबडतोब चाखायची / खायची इच्छा होतेच, आवरणं अतिशय अवघड. म्हणजेच सुगंध आणि स्वाद हे फारच एकमेकांशी निगडित आहेत, किंबहुना "सुगंध येतो म्हणून स्वाद घ्यावासा वाटतो, स्वादिष्ट आहे काही म्हणजे त्याचा सुगंध सर्वदूर पसरणारच आणि असणारच ना". म्हणजेच स्वादिष्ट आहे म्हणून सुगंध येतो आणि सुगंध उपभोगल्यामुळे स्वाद वृद्धिंगत होतो. आणि हो हे फक्त खायच्या पदार्थांबरोबर होत नाही बरं का मंडळी. प्रत्येक व्यक्ती, वस्तू, ठिकाण, जुन्या-नव्याचा एक विशिष्ट सुगंध असतोच, आपल्या अवतीभोवती सदोदित, प्रत्येक कृतूचा वेगळा असा.  शोधा, अनुभवा आणि आनंद उपभोगाचं त्याचा. ह्या पुढील सगळेच क्षण सुगंधी आणि स्वादिष्ट अनुभवाने भरपूर असे असोत हि सदिच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...