ह्या शब्दाचा साधा अर्थ म्हणजे उरली सुरली देवाण घेवाण पूर्ण करणे असा होतो, मग तो पैश्याचा व्यवहार असो किंवा अजून काही. ह्या व्यतिरिक्त अजून एक अर्थ पण साजेसा आहे ह्या शब्दाला तो म्हणजे एखाद्याने तुम्हाला भेट म्हणून काही दिले प्रेमाने तर ते त्याला किंवा अजून कोणाला तरी परत करणे. नेहेमी हिशोब साफ ठेवावा असं म्हटलं जातं आणि बहुतांशी सगळेच ठेवतात, अपवाद असतात आणि असावेत. कोणाला कधी कुणाची / कशाची गरज भासेल सांगता येत नाही. कदाचित ह्यामुळेच असेल आपल्या भेटीगाठी ह्या माणसाच्या हातात ठेवल्या नाहीतच "त्याने". प्रत्येक भेटी मागे काही ना काही तरी दडलं असतं हे निश्चित. एकतर कोणाला तरी काहीतरी शिकायचं असतं, द्यायचं किंवा घ्यायचं असतं. हि देवाण घेवाण विचारांची असते, कृतीची असते, गोष्टींची असते किंवा अजून काही. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलं कि अनाहूतपणे शिकलं किंवा आत्मसात केलं जातं च. ते कदाचित शब्दांच्या पलीकडले असेल, कुठल्याही आकड्यात मांडण्यासारखे नसेल पण निश्चित शिकलं जातंच. प्रत्येक भेट सुनिश्तिच असते, ठरलेली असते, पण कधी कुठे केव्हा हे मात्र गुपित असतं. आणि ती प्रत्येक भेट वृद्धिंगत करून जाते ह्यात शंकाच नाही. बरं भेट हि फक्त दोन व्यक्तिंमधेच होते आणि तीच सर्वोपयोगी असते का? तर नाही मंडळी. भेट हि इतर सर्व सजीव निर्जीव वस्तू, ठिकाणं, पदार्थ, ई. सर्वांशी शक्य आहे आणि जी नवीन काही तरी शिकण्याला कारणीभूत ठरू शकते, हिशोब चुकता करायला मदत करते आणि स्मृती देऊनी जातेच. ह्या सगळ्याच भेटी बहुतांशी चांगल्याच स्मृती देऊन जातात, चांगलेच शिकवून जातात आणि एक वेगळं समाधान देऊन जातात, कुठेतरी हे जाणवतं भेटीचं खास कारण, त्या भेटीचा उपयोग, त्या भेटीमागचं कारण / अनेक कारणं. कधी कधी अचंबित करणारं घडून जातं अगदी माणसाच्या / बुद्धीच्या आकलनापलीकडचं असं. त्या भेटीच्या स्मृतीचा गंध / सुगंध हा सर्वदूर पसरतो आणि कदाचित त्यामुळे आणि "त्याच्या" हिशोबाप्रमाणे पुढील भेटीचं कारण ठरत असेल. त्या स्पंदनांचा प्रचंड मोठं नेटवर्क असावं असं वाटतंय. त्यामुळे सगळ्याशी होणाऱ्या भेटीगाठी ह्या त्या सर्व श्रेष्ठ ऊर्जेने ठरवलेल्या असतात त्यात शंका न घेता सातत्याने नवनवीन गोष्टी शिका, अनुभवा, पुढे न्या, पसरवा आणि अत्यानंदाचा स्वाद घेत राहा. सरतेशेवटी माणसाने आयुष्यभर शिकायचं च असतं, कळत नकळत तो शिकत असतोच, हे त्रिवार सत्य आहेच.
रविवार, १५ मे, २०२२
हिशोब
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा