खूपच वर्षांनी हा शब्द मी वापरते आहे, किंबहुना बघितलंच नाही मी पेपर वेट कित्येक वर्षात. संपुष्टात आली कि काय हि संकल्पना? असं प्रश्न मनात डोकावत होता तेवढ्यात एक नवीन पद्धतीचं पेपर वेट नजरेस पडलं आणि खात्री झाली कि अजूनही हि बहुउपयोगी वस्तू लागते आहे, वापरात आहे. गोल गोल फिरवलेला, हाताला चाळे नुसते, फेकून मारायला, त्याच्या आत कलाकारी करायला, ई. त्याचा उपयोग होता, म्हणजे कागदं उडू नये हे जरी मूळ उदिष्ट असलं तरी. सध्या काय जगी, स्थळी, पाषाणी बघावं तेथे AC असतो, तो फारच नाजूक पद्धतीने गारेगार हवा फेकण्याचं काम करतो जे त्याला नेमून दिलं आहे. त्यामुळे असेल हो कदाचित कि हे पेपर वेट दिसेनासे झालेत. किंवा सध्या बहुतांशी सगळंच ऑनलाईन होत असल्यामुळे पण कागद जर वापरलाच जात नाही तर मग त्यावर वेट ठेवण्याची गरजच नाही कारण ते उडून जाताच नाहीत, काही नसतंच उडून जायला नाही का?
आज उन्हाळ्याचा एक दिवस. वर्गात ऑफलाईन परीक्षा घेत होते. प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिका होत्या खूप साऱ्या आणि पंखे संपूर्ण ५ च्या गतीने सुरु होते, सगळेच्या सगळे. त्यामुळे पेपर वेट ची प्रकर्षाने उणीव भासली असे शब्द ओठातच राहिले माझ्या कारण मी आणि माझी संशोधक विद्यार्थिनी ने आपापले मोबाईल फोन न कळत ठेवले होते कि त्या पत्रिकांवर. बिचारे मोबाईल फोन, त्याचे उत्पादक, विक्रेते आणि संशोधक कोणाला म्हणजे कोणालाच हे स्वप्नात देखील वाटलं नसेल कि मोबाईल चा एके दिवशी फक्त पेपर वेट म्हणून सदुपयोग होईल. मोबाईल बिच्चारा आधीच किती ओव्हर लोडेड आहे, सगळ्यांची संभाषणं ऐकतो, करमणूक करतो, तापमान सांगतो, बातम्या ऐकवतो, उठवतो पहाटे, आठवणी करून देतो कामाच्या, सगळे संपर्काचे नंबर, मेल ई. जपून ठेवतो, आरास म्हणून देखील काम करतो, दिशा दर्शक होतो, बाप रे, आणि आता त्यात हे एक नवीन काम / जबाबदारी अंगावर आली बिच्चाऱ्याच्या. कित्ती दमणूक होतं असेल नाही त्याची.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा