आज अर्धशतकी वयात नव्याने उमगला टाळ्यांचा अर्थ, टाळ्यांमागचा उद्देश्य किंवा टाळ्यांमागचा माणूस. अगदी नकळत्या वयापासून मी स्वतः असंख्य वेळा टाळ्या वाजवल्या, बघितल्या, ऐकल्या, वाचल्या आणि अनुभवल्या देखील. पण आज काही तरी वेगळं होतं हे नक्की. एका समारंभात माझ्या चार डोळ्यांना असं आढळलं कि काही मोबाईल वर दुसरा हात अलगद खाली वर करत आहेत, काही टेबलावर एक हात हलकासा आपटत आहेत, काहींचा एक हात स्थिर आहे आणि दुसरा त्यावर वाजवला जातोय, काहींचे दोन्ही हात कामात येत आहेत, काही एका हाताच्या तळव्यावर दुसरा हात टेकवत आहेत, काही दोन तळवेच वापरात आहेत, काही फक्त एकदाच हातावर हात आणि बास, काही दोन्ही हात नमस्कार स्थितीत ठेवून तर काही दोन्ही हाताची बोटं फैलावून टाळ्या वाजवतात आहेत. माणसागणिक बदल आढळला मला आज प्रकर्षाने. हे सगळं बघून मला असं जाणवलं कि काही:
- मोबाईल वर दुसरा हात अलगद खाली वर करत आहेत = हं, ठीक आहे, चांगलं आहे
- टेबलावर एक हात हलकासा आपटत आहेत = पूर्ण सहेमत आणि उस्फुर्त ताबडतोब दिलेली प्रतिक्रिया
- काहींचा एक हात स्थिर आहे आणि दुसरा त्यावर वाजवला जातोय = फार उत्तम नाही हो
- काहींचे दोन्ही हात कामात येत आहेत = उस्फुर्त, अत्यानंद झालेला
- एका हाताच्या तळव्यावर दुसरा हात टेकवत आहेत = असं का, बरं, ऐकलं
- दोन तळवेच वापरात आहेत = मनापासून दाद
- फक्त एकदाच हातावर हात आणि बास = व्हॉट एव्हर
- दोन्ही हात नमस्कार स्थितीत ठेवून तर काही दोन्ही हाताची बोटं फैलावून टाळ्या वाजवतात आहेत = प्रचंड उत्साही प्रतिसाद
- तर मोठ्याने टाळया आणि शिवाय चेहेऱ्याचे हावभाव = फारच निखळ मनाचा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा