संगणक अनेक रंग ढंगात उपलब्ध आहेच, त्यात टच स्क्रीन आणि साधे हे देखील आहेत बाजारात आणि प्रत्येकाची आवड शिवाय परवडायला पण हवं. प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच आणि गरज पण. त्या नुसार लॅपटॉप किंवा डेस्कटॉप विकत घेतले जातात.
त्या व्यतिरिक्त मी जेव्हा संगणक शिकायला सुरवात झाली नेमकी तेव्हाच माणसाला बहुउपयोगी अशी मेनू ड्रिव्हन सिस्टिम नव्हती, कंमांड्स द्याव्या लागायच्या,लिहाव्या लागायच्या प्रत्येक वेळी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यामुळे कीबोर्ड खूप उपयोगी येत असे. कीबोर्ड शॉर्टकट्स पण माहित असणं अत्यावश्यकच होतं किंबहुना फॅड होतं म्हणा ना. तेव्हा कधीच मी पडले नाही कि कीबोर्ड शॉर्टकट्स का शिकायचे? वगैरे. पण शिकले, आवड म्हणून. पण आज त्याचा प्रकर्षाने उपयोग होतो आहे मला. माझा उंदीर सध्या आजारी आहे, नाराज आहे, खूप उपचार करून देखील त्यात जीव परत येत नाही आहे. पण संगणक म्हणजे माझा जीव कि प्राण, श्वास, आत्मा ई. आणि सगळंच त्यात आहे, आता? हा प्रश्न पडायच्या आत मी कीबोर्ड शॉर्टकट्स वापरले, टच स्क्रीन च्या उपलब्धतेचा पुरेपूर सदुपयोग करून घेतला आणि काम अडू दिल नाही. बघा म्हणजे संगणक, शॉर्टकट्स आणि डोंगराएवढे काम ह्या मुळे आधी शिकलेलं आणि सध्याची अद्ययावत सुविधा किती कामाला येते आहे. मला पक्की खात्री आहे कि टच स्क्रीन काढण्यामागे हा असा प्रमुख उद्देश असावा ज्याने हे संकल्पना शोधून काढली त्याचा, किंवा त्याला असं उंदीरमामाने अडवलं असेल म्हणून कदाचित. असो. मी तर हे सगळे इतकं म्हणजे इतकं एन्जॉय करते आहे कि ज्याचं नाव ते. मज्जा येते आहे. थोडीशी गती कमी झाली आहे पण ती पण एक मज्जाच नाही का?
रविवार, २९ मे, २०२२
टच स्क्रीन संगणकच का?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा