प्रत्येक जण, सजीव व्यक्ती, प्राणी, पक्षी, माणसं अगदी सगळे म्हणजे सगळेच पुढे जात असतात, तसेच प्रयन्त सुरु असतात सतत, नाही का? बाळ आईच्या पोटात कणा कणाने वाढतं, जन्माला आलं कि "जीवन चक्र" सुरु होतं पुढे सरकण्यासाठी च. मग शैक्षणिक क्षेत्रात देखील पहिली ते दुसरी मग तिसरी ... चढता क्रमच, नोकरीत / धंद्यात, कमावण्यात, दोनाचे तीन / चार होणे, एक मजला मग दुसरा, छोटी गाडी नंतर भली मोठी ई. चालूच राहतं सतत, आणि चालू राहणं म्हणजेच "त्याचा" भरभरून आशीर्वाद, नाही का. आधीच्या वर्गातून पुढील वर्गात जाणं म्हणजे बुद्धी शाबूत असण्याचं प्रतीक, शारीरिक समृद्धीची शाश्वती, मोटर स्किल्स शाबूत असण्याची ग्वाही ई. इतकं सगळं ठाऊक आहे, स्वतःला आपण सर्व स्मार्ट आणि जगावेगळे हुशार समजतो, मग सगळ्याच बाबतीत पुढे का नाही जात प्रत्येकजण? विरुद्ध दिशेने का प्रवास आणि थांबा निवडतो बहुतांशी सर्वच जण? इतकं सोप्प नसलं तरी प्रयन्त होतांना का दिसत नाहीत? "रात गई बात गई" इतकं सहज आहे तसं पाहायला गेलं तर, मग "त्याने मला अमक्या वर्षा पूर्वी तमकं म्हटलं", "तो/ती अशी तशी वागली माझ्याशी", "बघून घेईन", ई. विचारांनी सगळे विरुद्ध दिशेला मार्गक्रमणा का करत असतो, घरी दारी प्रत्येकवेळी तेच तेच. सोडा मंडळी, प्रयन्त कराच. प्रत्येक दिवशी नवा सूर्य उगवतो हो, नवीन सुगंध घेऊन फुलं उमलतात, मातीचा सुगंध प्रत्येक वेळी हवाहवासा च वाटतो, नवीन असल्यासारखा, मग सगळं इतकं अप्रतिम नावीन्यानी भरपूर असतांना मनानी मागे का जायचं? मळभ दूर सारा आणि निरभ्र आकाशाला गवसणी घाला हो, प्रत्येक क्षण / दिवस = सण, तो आनंदाने साजरा करा.
शनिवार, ११ जून, २०२२
विरुद्ध दिशा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा