प्रत्येक अनोखा सण / दिवस / क्षण साजरा मग तो वाढदिवस असो, प्रेम-दिवस, बढती, काहीही खास व्यक्त करायचं असेल तर सुगंधी फुलांचा आधार घेतोच. त्या फुलांचा सुगंध तो खास क्षण अजून वृधंगीत करतो, म्हणून जगभर सुगंधी फुलांना प्रचंड मागणी आहे. पण फक्त फुलांचा सुगंधच महत्वाचा का मंडळी? तर त्याचं दिसणं देखील तितकचं भाव खाणारं. आता ट्युलिप्स च्या बगीच्यांचंच घ्या ना, सौंदर्य अगदी मैलोन्मैल पसरलेलं. त्या तुमच्या कॅमेरात न टिपत्या येण्यासारखंच. पुष्पगुच्छा साठी ठराविक फुलं वापरली जातात, गजऱ्यासाठी फारच वेगळी, हारासाठी त्याहून निराळी तर फुलदाणीसाठी भलतीच. माझ्या दृष्टीने गजऱ्याची मुळ शोभा घनदाट आणि काळ्याभोर वेणी / केसांमुळे, प्रत्येक फुलांची शोभा त्यांच्या आजूबाजूला असलेल्या हिरव्यागार विविध छटांमुळे, पानांच्या आकारांमुळे, करड्या रंगांच्या फांद्यांमुळे, काळ्याशार मातीमुळे, ट्युलिप्स च्या शोभेला आकाशामुळे चारचाँद लागतात... प्रत्येक सुगंधाला आणि सौंदर्याला अवतीभोवतीचे अनेक घटक कारणीभूत असतात. आज नंतर / आज पासून फक्त फुलांना धन्यवाद नाही तर पानांना, फांद्यांना, मातीला, हवेला, सुर्यकिरणांना, प्राणवायुला, प्रत्येकाला द्या. कारण साधं आणि सरळ आहे, जमीन, फांद्या, पानं नसती तर फुलं आलीच नसती हो / त्यांचं अस्तित्वच निर्माण झालं नसतं. मुळात सुगंध आणि सौंदर्य हे प्रत्येक सजीवाच्या संपूर्ण "लाईफ प्रोसेस" अक्का ठराविक नैसर्गिक प्रक्रियेमुळे आहे, हे नेहेमी ध्यान्यात असू द्या, एकट्याने कदापी काहीही होणे नाही. त्यामुळे कृतज्ञ राहा सदोदित. प्रत्येक अणुरेणू महत्वाचा, मान द्या आणि घ्या, बहरत राहा सदा.
शनिवार, ११ जून, २०२२
सौंदर्याचं गमक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा