एकटा ह्या शब्दाची परिभाषा आणि एकंदरीत मतितार्थ मजेशीर आहे. एकटं राहणं अजिबातच सोप्प नसतं कुणालाच, मग ते छोटं बाळ असो, किंवा आजी अथवा आजोबा, कोणीही माणूस कोणत्याही वयात. दोन पध्दतीचे एकटेपण नजरेस पडतं ह्या समाजात वावरतांना, एक म्हणजे खरंच त्या व्यक्तीच्या आजूबाजूला कोणीही नसतं अनेक कारणांमुळे (भागीदार / सवंगड्याचं देवाघरी जाणं, नवीन पिढी परदेशी स्थाईक असणं किंवा अजून काही), स्वतः ठरवून आधुनिक अश्या सर्वसोयीनी युक्त ठिकाणी राहणं ई. दुसरं म्हणजे असंख्य मंडळी आजूबाजूला असून देखील एकटेपण अनुभवणं. जर एखादी व्यक्ती गोतावळ्यात राहून एकटी आहे किंवा एकटी झाली आहे, दोन्ही बाबतीत स्वतःला स्वतःच्या स्वाथ्यासाठी तरी अनेकविध कामात व्यग्र ठेवणं अतिशय गरजेचं आहे, आणि ते शारीरिक + मानसिक + थोडसं अध्यात्मिक + सामाजिक + बौद्धिक अश्या स्वरूपाचं असावंच. आपल्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक गणितांना सांभाळून पण गुंतून राहणं अत्यावश्यकच. घरकाम हे सगळ्यात भन्नाट, मग बागकाम घरचं नाहीतर सोसायटीतलं, वाचन, लिखाण, वैविध्य खेळ (बैठे, मैदानी ई.), हटके पदार्थ करणे, व्यायाम, गप्पा, संगीत, वाद्य, सल्ला, मदत, जुन्या लोकांशी भेट, सामाजिक कार्य, शिकवणे, अनुभव कथन आणि उपयोग, कला ई. एकटेपणा जाणवू लागल्यावर मग त्यावर तरणोपाय शोधून काढण्यापेक्षा आधीच त्यावर काम करा, नियोजन करा आणि पाळा, म्हणजे मग एकटा हि सौंज्ञा शब्दकोशातून नाहीशी होईल.
हि झाली नाण्याची एक बाजू.
ह्याच नाण्याची दुसरी बाजू देखील आहे हो, ती म्हणजे आताशा एक नवीन खूळ तक धरू पाहतंय, ते म्हणजे "मी टाईम" म्हणे. एकटेपण मागून घेतात लोकं, त्यासाठी आदळआपट पण करतात आवश्यक असल्यास, एकट्याने लग्न करू पाहतात आणि आयुष्यभर एकटे राहण्यावर भर देतांना आढळतात, सर्वत्र. आणि हे सर्व करणारी मंडळी आहेत तरुण, ऐन उमेदीच्या काळात हे सगळं. हे जे सगळे मागतात ते खऱ्या अर्थाने एकटेच राहात असतात म्हणजे सतत एकट्याने मोबाईल वर तासंतास डोकं घालून बसायचं, एकट्याने ऑफिस ला जायचं यायचं, खाणंपिणं सगळं एकटंच आणि तरी देखील त्यांना "मी टाईम" पाहिजे, अर्थात अपवाद असतातच सगळीकडे, तसे इथेही सापडतील.
ह्या सध्याच्या पिढी च्या आधी सोशल मिडिया नावाचं खूळ नव्हतं म्हणून लोक एकमेकांशी भेटीगाठी करतं असतं / होत असे, सण समारंभ मोठ्या प्रमाणात, सातत्याने लोकांचे येणंजाणं असायचं त्यामुळे एकटेपण जास्त प्रमाणात जाणवत असेल जर एकट्याने राहायला लागलं तर. असो.
गोळाबेरीज अशी कि तारुण्यात आनंदाने भरपूर पेरा, काम करा आणि जमापुंजी साठवा, आणि उतारवयात ती अत्यानंदाने वापरा म्हणजे वेगळ्या अर्थाने बहरता येईल प्रत्येकाला. एकटेपण, छे छे, ते काय असतं? असं काही असतं का?
शनिवार, ११ जून, २०२२
एकटा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा