बुधवार, १३ जुलै, २०२२

सहकुटुंब ट्रीटमेंट

"खिचडी" ह्या सदरात काल मी लिहिल्याप्रमाणे गेले तीन एक दिवस माझं पोट माझ्यावर विनाकारण नाराज होतं, असो कधी कधी त्याचे पण दिवस असायला पाहिजेतच ना. काल सरतेशेवटी मी डॉक्टर गाठलाच, पर्याय नव्हता म्हणून. माझ्या डॉक्टर घरूनच त्यांचा दवाखाना चालवतात. त्यामुळे त्यांना मी आधी कळवून गेले, फक्त खुर्चीवर टेकले नाहीतर वाफाळलेला चहा माझ्या हातात आला आणि एक गोड धमकी पण त्या सोबत "कि मी विचारत नाही आहे, देतो आहे चहा आणि तो प्यायचाच, पाऊस पडतो आहे बाहेर, तू ऑफिस मधून आली आहेस थेट त्यामुळे चुपचाप घ्यायचा हा चहा आधी", इति काका. डोळ्याच्या कडा आपोआपच ओल्या झाल्या, नकळत. म्हणजे बघा कसे भन्नाट औषध मिळतं मला नेहेमीच त्यांच्याकडे गेल्यावर. फक्त डॉक्टर काकू नाही तर सहकुटुंब इलाज करतं दरवेळी, न चुकता, गेले अनेक वर्ष. हि मी घटना संध्याकाळी माझ्या अजून एका मैत्रिणीला ऐकवली तर म्हणते कशी ह्या नक्कीच होमिओप्याथी किंवा आयुर्वेदाच्या डॉक्टर असतील, ऍलोपॅथी वाले नक्कीच नाही. हे त्यांना कसं समजलं माहित नाही आणि हो ते खरं देखील आहेच. कारण माझ्या ह्या होमिओ प्याथीच्याच डॉक्टर आहेत. जशी होमिओप्याथी शारीरिक आणि मानसिक स्थरावर काम करते तसेच मग ते डॉक्टर पण आपोआप घडतात का? हे त्यांचं वैशिठ्य आहे कि काय कोणास ठाऊक. दारी आलेला आजारी व्यक्ती पट्टकिनी बरा होणं महत्वाचं आहे सर्वार्थाने. मला हे असं सगळं माझ्या लेकाच्या दवाखान्यात सुरु करायचं आहे जेव्हा त्याची प्रॅक्टिस सुरु होईल काही वर्षांनी. माझ्या लेकाला तो डॉक्टर झाल्यावर आणि बाकी इतर समस्त डॉक्टर मंडळींना, आणि नर्स, वॉर्ड बॉय ई. सदबुद्धी मिळो आणि त्यांनी देखील सगळ्या पेशंट्स ना उत्तम सेवा प्रदान करो नेहेमीच हिच ईशचरणी प्रार्थना.   "माणसाने माणसाशी माणसा सम वागणे". ह्या नाहीतर त्या स्वरूपात "तो" नेहेमीच देतो मला भरभरून, सातत्याने, कुठेही कणभरही कमी न पडू देता. त्यामुळे एखाद्याच व्यक्तीकडून अपेक्षा करणे सपशेल चुकीचे आहे, वेळ फार दवडतो ह्याच्यात एक तर अपेक्षा करण्यात आणि भंग झाल्यावर त्यात पुन्हा. त्यामुळे फक्त चांगले / उत्तम कामं करत राहा, पेरत राहा, फळं आपोआप आणि निश्चित मिळणारच.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...