"व्यक्ती तितक्या प्रकृती" हि म्हण आपण गेले अनेक पिढ्या ऐकतं आलो आहोत आणि ते आत्मसात देखील केलं आहे सर्वानीच. ह्याच्या पुढची पातळी म्हणजे अनेक चेहेरे असलेली व्यक्ती. बऱ्याच प्रकारच्या व्यक्ती आढळतात आपल्याला समाजात आणि कधी गरज पडल्यास विविध चेहेरे पांघरावे लागतातच पण प्रत्येकाने ते टाळावं, छोट्याश्या मेंदूला उगाच ताप आणि नाही त्या गोष्टी उगाच सांभाळाव्या लागतात, लक्षात ठेवाव्या लागतात ते वेगळंच. आपल्या कुवतीप्रमाणे, शैक्षणिक पार्श्वभूमीनुसार, अनुभवानुसार आणि अर्थात "त्याच्या" अनोख्या समीकरणानुसार / हिशोबानुसार आपल्याला कामं सोपोवली असतात. तीच इतकी भरमसाठ असतात मग दुसरा / तिसरा ई. चेहेरा आणखीन जास्तीचा कशाला. आहे ते उत्तम संभाळा म्हणजे मिळवलं. असो.
संगणक क्षेत्रात गेली अनेक वर्षे निसर्ग-प्रेरीत अल्गोरिदम (नेचर इन्स्पायर्ड अल्गोरिदम) फार मोठ्या प्रमाणात वापरात आहेत. त्यात निसर्ग किंवा लोकांची मानसिकता ध्यानात घेऊन विविध प्रोग्रॅम्स तय्यार जातात. ज्यामुळे ते सजीव व्यक्तींना वापरायला अगदी सोप्पे आणि फारच उपयुक्त ठरतात. त्यामुळे सहज मला एक गोष्ट ध्यानात आली कि अनेकदा मी माझ्या घरी काम करणाऱ्या मावशींना जेव्हा जेव्हा फोन करते तेव्हा तेव्हा एक अतिशय सुंदर गीत ऐकवलं जातं म्हणजे माझ्या वेळेचा सदुपयोग होतो. ते गीत इतकं सुंदर आहे, अगदी मनाला भिडतंच. एकदा त्या मावशी माझ्या घरी असतांना त्यांना एक फोन आला आणि अहो आश्चर्यम, वेगळीच धून वाजली. मग मी तिला विचारलं, तर म्हणतात कश्या तुम्हाला ऐकवायला वेगळं गीत ठेवलं आहे आणि मला विविध पद्धतीच्या धून लावून दिल्या आहेत मुलांनी. कित्ती त्या पिटुकल्या फोन ला त्रास, देवा, काय हे, म्हणजे एकच फोन, दोनच व्यक्ती एकाच वेळी बोलणार पण ऐकणार मात्र वेगवेगळ्या धून, जे कोणालाच माहिती नाही. किंचित गुंतागुंत आहेच, जसे कि विविध चेहेरे घेऊन वावरणाऱ्या व्यक्ती. मूलभूत / प्राथमिक भरपूर ट्यून्स दिल्या आहेत ना मोबाईल मधे आणि मोबाईल चा खरा उद्देश गरजेच्या वेळी पट्टाकिनी आवश्यक व्यक्ती पर्यंत पोचणे हे आहे. मग इतका आटापिटा कश्या साठी?
असो, हे वैशिट्य / हि
असंख्य गाण्याची सुविधा मोबाईल मधे कुठून आली हे गुपीत समजलं हे महत्वाचं. हे ज्याच्या
कोणाच्या सुपीक डोक्यातून आलं आहे त्याला साष्टांग दंडवत. खऱ्या अर्थाने नेचर इन्स्पायर्ड आहे हे multiple phone hello tune's fad.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा