बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२

लांबलेलं दुखणं

काही जणांना तोंड उघड ठेवून बिनधास्त खोकण्याची सवय आहे. तुम्ही म्हणालं कि हे लिहिणारी आणि ते देखील कोव्हीड नंतर पूर्ण पागल आहे. शिक्षितच काय अशिक्षित सुद्धा आता हे असं कधीच करणार नाहीच. सध्या तर "ताक फुंकून पिण्याची" वेळ आहे. हे अशक्यच आहे. 

अजून एक प्रथा म्हणजे प्रत्येकवेळी दुसऱ्याला दोष देणं सतत आणि ते देखील फार टोकाचे आणि टोचणारे शब्द वापरून. हे असे दोष देणारे खरं तर उच्च विद्या विभूषित, परदेशी भाषेत  शिक्षित (convent / international school educated), अस्खलित आक्षेपार्ह शब्द वापरतात कारण त्यांना अंग्रेजी शाळेत त्या करताच तर पाठवलं होतं ना?. आणि अशिक्षित वाटेल अश्या गावंढळ भाषेत बोलणं सुरु ठेवतात, सोडत नाहीत. अगदी कधी कधी शुल्लक कारण असतं तरी आव मस्त आणतात आणि थांबत नाहीत सहजी. असो. ह्या दोन्ही सवयींमुळे काय होतं ह्या बद्दल माझं मत मी आता मांडणार आहे.

ज्याला तुम्ही शिव्या देता, दोष देता तो / ती बरेचदा "किल बाय निगलीजन्स" किंवा "एखादं झुरळ झटकल्यासारखं" ते कधीच सोडून देतात आणि पिझ्झा फस्त करतात. पण जो शिव्या देतो त्याच्या अवतीभोवती जे व्हायब्रेशन्स आहेत / लहरींचं-वलय आहे ते बिघडतं जबरदस्त असं आणि ते टिकतं बऱ्याच काळ. शिव्या किंवा दोष हे समोरच्याला अद्दल घडवायला, स्वतः च मोठेपण सिद्ध करायला, कामचुकारपणा करायला केलं जातं पण घडत नेमकं उलटं.

अगदी तस्सेच तोंडावर हात किंवा रुमाल न ठेवता सतत खोकण्याची जी उत्कृष्ट सवय असते बऱ्याच जणांना ती कदाचीत ह्यामुळे असेल कि "काय होतंय", "तुमची रोग प्रतिकारशक्ती चांगली मजबूत नाही म्हणून तुम्हाला झालं, माझ्या खोकण्यामुळे अजिबात नाही", आणि बऱ्याच अश्या गोड गैरसमजा मुळे. पण जो चांगल्या सवयीनुसार तोंडावर हात / रुमाल ठेवून खोकतो त्याचा खोकला लवकर बरा होतो कारण (मी शरीरविज्ञानाची डॉक्टर नाही) ते बाहेर आलेले किटाणू पुन्हा आत शिरून वाढत नाहीत, कारण वाव नसतो, एकाच जातीचे असल्यामुळे. पण जर तोंड उघडून खोकत राहिलात तर बाहेर आलेले किटाणू तुमच्या अवतीभोवती तर राहतातच शिवाय हवेच्या संपर्कात आणि इतर उपस्थित असलेल्या बाकीच्या किटाणू / घातक जिवाणूंच्या संपर्कात आलेच तर आणि येतातच तर ते 

१. इतरांची रोग प्रतिकारक शक्ती उलटी  वाढवतात, जर सर्दी / खोकला दुसऱ्याला झालाच तर तो पट्टाकिनी बरा होतो, 

२. पण त्या उघडपणे खोकणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला पिंगा करत राहतात, असंख्य पटीने वाढत राहतात,  त्याच्याच शरीरात प्रवेश करतात आणि वाढतात कारण नवीन गडी पण सोबत आले असतात. 

म्हणून विचारपूर्वक कृती करा स्वतःसाठी, स्वतःच्या स्वास्थ्यासाठी. ह्या अश्या दोन वाईट सवयी जर असतील तर त्यावर काम करा ताबडतोब आणि स्वतःला मानसिक + शारीरिक त्रासापासून, व्यापापासून जपा.  

अगणित दिवसांचं दुखणं पुरतं, उगाच त्या उपचार करणाऱ्या डॉकटर ला दोष दिले जातात, "कितीही गोळ्या औषधं घेतली तरी मी बरा / बरी होत नाही" बेकार आहेत सगळे. ह्या सगळ्यात मुळ काय आहे हे समजलं असेलच आता. स्वतःशी थोड्याश्या गप्पा मारा, व्यवस्थित सर्वांची काळजी घ्या, मध पेरा जिभेवर मग काय दुखणं आलं तरी गेलं कधी हे समजणार देखील नाहीच.     
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...