बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२

ख्यातनाम / उच्चपदस्थ

काही दिवसांपूर्वी काही दिवसांसाठी माझी एका उच्च दर्जाच्या व्यक्तिमत्वाशी अचानक ओळख झाली. ओळख झाली म्हणण्यापेक्षा त्यांनी आपणहून करून घेतली. मला तर त्या क्षणी भरून आलं आणि फार धन्य वाटलं कारण इतकी मोठी व्यक्ती, म्हणजे त्यावेळी / प्रथमदर्शनी ते वयानी मोठे वाटत होते, म्हणजेच मानाने पण असणारच, आणि हो, इतक्या मोठ्या अनेक कंपन्या मध्ये सर्वोच्च पदावर काम केलेलं ते देखील सातत्याने अनेक वर्ष, म्हणजे माझी दाही बोटे तोंडातच. हे सर्व अर्थात त्यांनीच मला सांगितले आणि त्यापेक्षा म्हणजे ते कित्ती तास सलग विद्यार्थ्यांना शिकवतात वगैरे. यादी फार म्हणजे फार मोठी आहे. का कुणास ठाऊक, मी कधीच कोणाशीही कदापि तुलना वगैरे करत नाहीच, पण ह्या वेळी भडिमार इतका होता कि साहजिक / नकळत झाली चूक, म्हणजे मी माझी मलाच अगदीच नगण्य / खुजी वाटू / भासू लागले काहीही संबंध नसतांना. त्यांचा मार्ग, दिशा, मार्गक्रमण, उद्देष ई. पार म्हणजे पार वेगळं असून देखील असो. 

म्हटलं जाऊ दे. मी तशी फार ऐकून घेणारी आहे (patient listener), त्यांना ते कदाचित आवडलं आणि माझ्याकडे त्यांना सांगण्यासारखं काही म्हणजे काहीच नव्हतं त्यामुळे मी फक्त श्रोती होते आणि निरीक्षक, बास. 

आमच्या शेवटच्या भेटीत काही निराळंच घडलं ते इतकं भलतं होतं कि मी पुरती हादरले, मुळापासून हो. देवा. तर त्या दिवशी न्याहारी मधे अप्रतिम असा मेथी पराठा वाढण्यात आला. त्या सोबत सर्वोत्कृष्ट असं वाटीभर दही देण्यात आलं. ह्या व्यक्तीने काय करावं तर जमेल तेवढं आधी मीठ आणि काळी मिरी पूड घातली त्या दह्यात आणि मग मला दिली, "तुम्ही पण घ्या". त्या दिवशी बहुतेक स्वयंपाकीचा किंचितसा अंदाज चुकला होता आणि त्याच्या हातून मीठ जास्त पडलं होतं पराठ्यात. त्यांना आदर्श आणि अनुभवी म्हणून आधी वाढलं गेलं सर्व मग माझा नंबर. त्यामुळे मी नंतर चाखून पाहिलं तेव्हा समजलं. असो. ज्याची त्याची चव आणि गरज / सवय. मग अजून एक वाटीभर दही त्यांनी मागितलं. मग ते संपत नाही तेवढ्यात गरमागरम मसालेदार दुधाने भरपूर असा चहा देण्यात आला. तो देखील मोठ्या कपभर फस्त केला व्यक्तिमत्वाने. बरं, जेव्हा जेवणाच्या टेबल वर आम्ही आलो काही मिनिटांच्या अंतराने तेव्हा बघतो तर काय शिस्तीप्रमाणे ८-१० तय्यार केळी सुबक-सुंदर तबकात मांडून ठेवण्यात आली होती. ह्या गृहस्थाने चहाचा कप ठेवतो ना ठेवतो तर दोन केली कि फस्त केळी हो. बाप रे. माझी फक्त दातखिळी बसली नाही हा प्रकार बघून. काय हे? उच्चशिक्षितांचं लक्षण? काय, कधी, किती, कश्या नंतर / आधी काय खावं ई. ची यत्किंचीतही जाणीव नसावी? ह्याची मला खंत वाटते. एखादा छोटा पिल्लू असता, अशिक्षित असता, किंवा थोडासा वेडा वगैरे असता तर वेगळी गोष्ट होती, पण इथे तर स्वतः बद्दल सांगतांना काय कोड कौतुक होतं ते. अर्थात हा त्या दिवशी कळस होता. नंतर आठवलं मला कि बाकी दिवशी हेच सगळं होतं होत पण काकडी सोबत, पापडासोबत ई. संपूर्ण भांडभर तळून आणलेले पापड त्यांनी त्यांच्याच समोर ठेवून घेतले होते आणि जेवण म्हणून ते खात होते, तोंडी लावणं म्हणून नाही. बरं टेबलावर ठेवलंय म्हणजे खायलाच हवं असं नाही, हे एक, आणि अहो कितीही भूक लागली असली तरी केळ खाण्याची एक शिस्त / पद्धत असते ना? बाप रेच.  

मी मागे एकदा पंगत नावाच्या सदरात अश्या संदर्भाचे काही मांडलं होतं, आणि पंगतीचं महत्व कथन केलं होतं. त्याचे प्रत्यन्तर आले पुन्हा उपभोगता मला. ह्या व्यक्तिमत्वाच्या जमान्यात पंगत होती हे नक्की, मग हे कशातनं काहीच शिकलेले दिसत नाहीत, "लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण". पण काहीका होईना मला एक लेख लिहिण्याकरता विषय देऊन गेला भलामाणूस. अहाहा च.

https://drpreetimulay.blogspot.com/2022/02/blog-post_6.html


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...