ह्या आधी नमूद केल्याप्रमाणे (https://drpreetimulay.blogspot.com/2022/07/blog-post_63.html) आणि जे सर्वश्रुत आहे "सा रे ग म कारवा" हे एक रेडिओ सारखे दिसणारे यंत्र आहे आणि रेडिओ सारखे थोडेफार चलनवलन पण आहे त्याचे. ह्या कंपनीने आधी फक्त एक रेडिओ सारखी वस्तू बाजारात आणली, ज्यात हजारो गाणी होती जी सदाबहार ह्या गटात मोडतात. दिग्गज संगीतकार, गीतकार, गायक, लेखक / कवी, ह्यांनी शब्दबद्ध, स्वरबद्ध केलेली अशी. भेटवस्तू म्हणून अप्रतिमच, शिवाय ज्यांना अगदी हलक्या आवाजात आपोआप एकामागे एक गाणे वाजावे असे वाटते त्यांच्या सर्वांनासाठी उत्कृष्ट भर हो कुटुंबात. कुठलाही व्यत्यय न येता आणि कुठल्याही जाहिराती शिवाय एका मागोमाग जर गाण्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर फक्त कारवाचं. मग ह्या कारवा चे अनेकविध प्रकार आले / उपलब्ध झाले बाजारात. आणि आता तर संपूर्ण गीता पण ऐकता येते, एक वेगळे यंत्र फक्त गीतेवर प्रेम करणाऱ्यांसाठी, गीतेच्या मार्गावर चालणाऱ्यांसाठी सहज सोप्प असं. आणि आत्ताचा टप्पा म्हणजे जवळपास १५०० गाणी असलेला चक्क मोबाईल आणलाय ह्याच कंपनीने. इतकी सारी गाणी, इतकी छोटी वस्तू, शिवाय आधुनिक मोबाईल मधे असलेले बहुतांशी सर्वच गुण देखील. रोज गम्मत म्हणून ३-४ गाणी ऐकायची म्हटली तरी वर्ष सहज निघून जाईल. आणि हो ह्या मोबाईल ला म्हणजे व्यावसायिक ध्वनिप्रक्षेपक यंत्र असल्यासारखे आहे, म्हणजे पार्टी असेल तर आणि जोरात गाणी ऐकवायची असल्यास ते देखील शक्य आहे. आणि किंमत फारच कमी.
ह्या कंपनीच्या कारव्यामधले सदस्य वाढतच चालले आहेत, एका मागून एक आणि उपयुक्त असे. आता ह्या पुढील टप्पा काय असेल हे बघण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली असणार, बघूया काय दडलंय ते. कदाचित खिशात मावेल असा रेडिओ घेऊन येतील, किंवा स्मार्ट घड्याळात काही शेकडो गाणी बसवतील, हेडफोन मधे चिप घालतील, स्वयंपाक घरातील उपकरणं पण आता बहुतांशी स्मार्ट झाली आहेत, ती पण शक्यता नाकारता येत नाही. वेळच सांगेल ह्याच उत्तर, नाही का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा