माझ्या अर्धशतकी वाटचालीत एक गोष्ट मात्र खात्रीने लक्षात आली आहे अनेक प्रसंगातून आता कि "तो" सातत्याने तुमची काळजी घेत असतो. कधीही म्हणजे कधीही तुम्हाला एकटं सोडत नाहीच. तुम्हाला क्षणिक मदत किंवा हवी तेवढी मदत पुरवतोच, निश्चितपणे. त्यामुळे निश्चिन्त मनाने कार्य घडू द्या तुमच्या हातून, बाकी सर्व त्याच्यावर सोडा. तो आहे. पण मग तुम्ही म्हणालं कि मी जे हे लिहिलं आहे ते सर्व खोटं आहे, कुठे असतो तो?, प्रत्येक वेळी नाही मिळत मदत ई. अगदी माझी पण विचारसरणी हिचं होती काही दिवसांपर्यंत पण आता नाही. जी माणसं आपली असतात, आपल्या सतत आजूबाजूला वावरत असतात, आपल्याला दिसतात आणि अनुभवता येतात ती त्यांच्या ठरावीक पद्धतीने, रोजनिशीप्रमाणे वावरत असतात, कार्य करत असतात आणि नकळत धीर / साथ देत असतात. तीच माणसं प्रसंगी अमर्यादित मदत करतात, सर्व स्थरावर ठाम उभे राहतात पाठिशी. "तो" सद्बुद्धी देतोच आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणूक होते, केली जाते आपोआप, न मागता, अपेक्षा न करता देखील. मग हे घडतं कसं? आणि हे दररोज का नसतं?. माझ्या छोट्याश्या मेंदूला पटलेली काही कारणं आहेत ती अशी, एक म्हणजे दरदिवशी खास काही दुसऱ्याची मदत घेण्याची गरज नसतेच, तो / ती समर्थ असते स्वतः सगळं निभावून नेण्याकरता, दोन म्हणजे जेव्हा अत्यावश्यकच असते गरज तेव्हा "त्याच्या" खास हिशोबा नुसार ती उपलब्ध होतेच. अगदी हिशोबानुसार हवी तेवढी प्रत्येक बाजूने भरभरून मदत मिळते. पण एकदा का ती गरज संपली कि मग मात्र "तो" त्याची सेना दुसऱ्या ठिकाणी सुपूर्त करतो.
अशी खास मदत एखादं उत्तमोत्तम कार्य हातून घडते वेळी देखील प्राप्त होते कुठल्यानं कुठल्या स्वरूपात, अनेकविध रूपात देखील, "त्याची" दूरदुर्ष्टी, त्याची पद्धत, सखोल अभ्यास आणि जगावेगळी काळजी हि आकलनापल्याड आहे सामान्य माणसाच्या. ते सर्व मदत करणारे हात मग नेमलेल्या दुसऱ्या कार्यात झोकून देतात आणि मग कदाचित गैरसमज होतो सामान्य माणसाचा कि हिच का ती माणसं? आता बदलली आहेत, पण तसं काहीही नसतं. आता तीच माणसं तुमच्या सारख्या दुसऱ्या गरजवंताला मदतीचा पुरवठा करत आहेत, म्हणजे तुमची ओळख संपली, किंवा तुम्हाला दुर्लक्षित वगैरे करत नाहीत हो, गैरसमज कधीही करून घेऊ नये, होतो बऱ्याचदा. जर एकाच चवीचा रस सतत चाखायला मिळाला तर तो पण नकोसा होतो. त्यामुळे "श्रद्धा आणि सबुरी", संपूर्ण विश्वास आणि समर्पण अत्यावश्यक आहे. सध्या जर तुम्हाला अपेक्षित आहे म्हणून जर मदतीचा ओघ येत नसेल म्हणजे तुम्ही ठणठणीत आहात, तुम्ही समर्थ आहात, दुसऱ्यांवर अवलंबून नाहीत आणि एकटे लढू शकता. हि नाण्याची दुसरी बाजू बघा आणि तुमच्या हातून नकळत कुणाला सहकार्य होतंय का? घडतंय का हे बघा नाहीतर. आलेला / मिळालेला दिवस आनंदात व्यतीत करा, भरपूर कार्य करा, आणि बाकीच्यांना पण करू द्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा