संपूर्ण धरती माता आपली सौंदर्याने नेहेमीच नटलेली असते, सजलेली असते, त्यात वैविध्य रंगछटा असतात काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित अश्या. सुगंध असतात, दृश्य आणि आवाज ह्याने नक्कीच मंत्रमुग्ध व्हायला होतंच. ह्या अश्या निसर्गाने दिलेल्या सौंदर्याची भरपाई प्रत्येक व्यक्तीने करायला हवी, किंबहुना तो करत असतोच, त्याच्या त्याच्या पद्धतीने. समाजाचं देणं पण असतं आणि ते देखील आपल्या दररोजच्या वागणुकीतून, वर्तवणुकीतून पण दिलं जातं आणि त्यात केशभूषा, वेशभूषा आणि एकंदरीत संपूर्ण व्यक्तिमत्व सामावलेलं असतंच. हे प्रत्येकाने करतांना स्वतःच्या शारीरिक ठेवणीचा, आपण ज्या व्यवसायात आहेत त्याचा, वयाचा आणि बाकी इतर बाबींचा विचार करायलाच हवा. ह्या अश्या सर्व थरावर काम करणे अत्यावश्यकच असतं कारण स्वतःला प्रेरित करण्यासाठी आणि दुसऱ्यांना देखील. दुसरे म्हणजे जे आपल्या आजूबाजूला आहेत, आपले सहकारी ई. सर्वांचे मिळून काम सुकर व्हावे ह्या करता हा सगळा आटापिटा. नवीन पिढी पण ह्यातून खूप काही सातत्याने शिकतं असते हे पण महत्वाचे आहे स्वतःला वेगवेगळे आभूषणं चढवताना, समाजात वावरतांना. सर्वांच्या घरी आरास असतोच, शिवाय दुचाकी, चारचाकी आणि आता मोबाईल, लिफ्ट आणि अनेक ठिकाणी आरास बघायची संधी मिळते. तेव्हा जागे व्हा आणि व्यक्ती अनुरूप रंगसंगती निवडा. वाचा, लक्ष ठेवा आणि मग विचारपूर्वक कृती करा, डोळस पणे. प्रत्येकजणच त्यांच्या परीने सुंदरच असतं पण ते सौंदर्य अधिक खुलून दिसावं म्हणून आपल्या निवडलेल्या कपड्यांचे रंग सध्याच्या फॅशन प्रमाणे, फिकट-गडद ह्याचा मिलाप असलेले आणि व्यक्तिमत्वाला बहर आणणारे असावेत, नेहेमीच. हा जर तुम्ही कुठे गड चढायला, किंवा नाच-गाणी करण्यासाठी जात असाल तर भडक किंवा साजेसे कपडे वापरावेत, वापरलेच पाहिजेत पण कचेरीत नाही. त्वचेचा रंग हा वरदान मानून त्यावर काम करावं, जे आपल्या हातात आहे त्यावर लक्ष केंद्रित करून स्वतःची छाप पाडावी. चला तर मग, गहूवर्णीय आणि कृष्णवर्णीय उठा आणि पट्टाकिनी मस्त, झक्कास, नाजूक, हलके, फुलांच्या पाकळ्यांचे आणि इंग्लिश वेगळ्या धाटणीतले रंग निवडूयात.
रविवार, २५ सप्टेंबर, २०२२
पेहेराव
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा