सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२

मी राजकन्या जशी

गेले अनेक वर्ष मी कचेरीत बस ने येणं-जाणं केलं, दररोज. पण आताशा पायांमुळे घर ते बस स्टॉप पर्यंत चालणं, आणि परत घरी हे अशक्य असल्यामुळे मागे एकदा लिहिल्याप्रमाणे पहिल्यांदा आयुष्यात गाडीवान ठेवला आहे. गाडीवान हा ऑटो रिक्षा चालक आहे, तो दिवसभर ऑटो चालवतो त्यामुळे त्याला मीटर चं पासिंग करायचं होतं म्हणून कामाच्या दिवशी सुट्टी घेतली होती. त्याची सुट्टी आणि कामं म्हणजे माझी भली मोठी पंचाईत. तश्या बऱ्याच मैत्रिणी आहेत जायला आणि यायला पण घरून अर्ध्या रस्त्यापर्यंत जावं लागतं मग तिथून कचेरी आणि परत तीच माझी वरात. थोडीशी मज्जा येते, वेगळ्या गाडीत बसायला मिळतं, अंतर बरंच असल्यामुळे भरपूर आणि विविध विषयांवर गप्पा होतात पण हे इथून-तिथे जाणं नक्को वाटतं. आणि त्यात अजून एक म्हणजे मी थोडीशी ठरलेल्या जागी लवकर पोचते आणि मग ताटकळत वाट बघत उभं राहावं लागतं जातांना गाडीची आणि येतांना रिक्षाची. आमचा तो एक भर रहदारीचा रास्ता आहे आणि तेथे टेकायला अजिबात जागा नाहीच. हे जास्तीचं दोनदा उभं राहणं होतं.

त्यामुळे ड्राईव्हर सुट्टी घेतो म्हणाला, मी देखील हो म्हणाले कारण पर्याय नव्हता, आणि हे सगळं माझ्या डोळ्यासमोर उभं ठाकलं. ह्या वेळी मी ठरलेल्या जागेवर पोचले अर्थातच माझ्या स्वभावा प्रमाणे बऱ्याचवेळा आधी आणि मनात विचार शिवायच्या आधीच मी काय बघते तर एक नाही ३ पायऱ्या, दोन ठिकाणी, कोऱ्या करकरीत, चकचकीत, ताज्या बांधलेल्या, एका नवीन दुकानासमोर. अहाहा च. कडा तर ओल्या झाल्याचं पण परमानंद देखील. मी आधी स्थानापन्न झाले आणि मग म्हटलं या आता कधीही, काहीही हरकत नाही. कधी कधी ह्या रस्त्यावरून मला जावं लागतं त्या वेळी माझी चांगली सोया व्हावी म्हणून फक्त माझ्याच साठी ह्या पायऱ्या बांधल्या आहेत. क्या बात है. काटे आले अक्षरशः अंगावर. कित्ती काळजी त्याला माझी, मनापासून धन्यवाद. मला एखाद्या राज्याची राजकन्या असल्याचा भास झाला. मी इतकी खुश कधीच नव्हते. आता घेऊ दे सुट्टी माझ्या ड्रायव्हरने, मला बसायला आता सिंहासन जे उपलब्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...