मला भावलेली जपमाळेची खासियत म्हणजे तो एक मोठा मणी, सुरवात आणि शेवट दर्शवणारा. हो हो अगदी योग्य वाचलंत मंडळी, दर्शवणारा. तुम्ही म्हणाल जप करतांना तर डोळे बंद असतात, असावे लागतात ना, मग दर्शवणार कसं? अगदी बरोबर, तेच तर, डोळे बंद असतांना जाणवलं / दिसलं पाहिजे ना कि एक माळ झाली. कारण जप म्हणजे काय, सरते शेवटी हिशोबच ना. असो. हि एक उत्सुकता मला लहानपणीपासून होती कि तो मोठा मणी हातात आल्यावर काय होत असेल जप करणाऱ्याला? त्यामुळे मी कधी कधी श्रावण सोमवारी वगैरे एक माळ करायची "ओम नमः शिवाय" ह्याची. ११ वगैरे नाही, तो मणी हातात येई स्तोवर, मोजमाप न करता. बघा कोणाचं काय तर कोणाचं काय. आज अचानक का आठवण झाली मला आणि ते देखील जपमाळेची?, सोमवार आहे आज पण श्रावणी नाही हो. तर सध्या गेली काही वर्ष पडदा ह्याची व्याख्या संपूर्णपणे बदलेली आहे. आधी विजोड, साडीचे, चादरीचे असे पडदे उत्साहाने मिरवले जायचे. त्यानंतर त्यात विविधता आली, पेल्मेट्स आले, ताण नाहीशे झाले आणि पाईप आले, एकावर एक जाडजूड त्यावर अत्यंत पातळ देखणा थर चढला, त्यानंतर कागदाचे आले, उजवी-डावी सरकण्याशिवाय वर-खाली सरकू लागले ई. अहाहा च. "काय वर्णू तव गुण अल्पमती नारायण". तर सध्या माझ्या कचेरीच्या खोलीत असाच आशयाचा नावीन्याने भरपूर असा पडदा विराजमान झाला आहे. त्याला वर-खाली करण्याची सोय आहे, अगदी सहज सोप्पी अशी, अगदी डोळे बंद करून उघड-झाप करता येईल अशी. काय काय काढतील, देवा$$$. आणि त्या दोरीला किंवा मण्यांची माळच म्हणा ना एकच भला मोठा मणी आहे. कश्या साठी? एक तर मर्यादित खाली-वर हालचाल व्हावी त्या पडद्याची म्हणून आणि कुठे थांबायचं हे माणसाला / तो पडदा उघड-झाप करणाऱ्याला समजावं म्हणून. नाही का?
आजच्या शिक्षक-दिनी कित्ती उत्तम आणि बहुमूल्य अशी शिकवण मिळाली बघा. प्रत्येकाला, प्रत्येकाच्या आयुष्यात आणि प्रत्येक कार्यात, विचारात, कृतीत, वागण्यात, बोलण्यात, निरीक्षण करण्यात, खर्च करण्यात, कमावण्यात, चालण्यात ई. "कुठे थांबायचं" हे उमगणे अतिशय महत्वाचे.असा एखादा मोठा मणी प्रत्यक्ष (/ अप्रत्यक्ष), जातीने विराजमान असणं, तो डोळेबंद असले तरी देखील जाणवणं आणि त्या ठिकाणी / वेळी थांबणं हे जमायला हवं, प्रत्येकाला.
ह्या व्यतिरिक्त जपमाळ काय किंवा ह्या अश्या पडद्याची मोत्यांची माळ काय सरते शेवटी हाताच्या बोटांना अॅक्युप्रेशर नकळत घडतं ते देखील जास्त महत्वाचं, वाखाणण्याजोगं आणि त्याचे पडसाद दीर्घकाळ टिकणारे असे.
As always, the last para carries such a deep message. Ma'am, you amalgamate the routine with the profound with flair.
उत्तर द्याहटवाशतशः आभार आणि धन्यवाद सर
उत्तर द्याहटवा