गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

 विद्यासन

कचेरीला जातांना सोमवार ते शुक्रवार बहुतांशी फक्त सलवार-कमीज किंवा तत्सम भारतीय पोशाख परिधान केला असतो मी, पट्टाकिनी घातला जातो, सांभाळायची तशी काहीच गरज पडत नाही, बहुतांशी सर्वच जण वापरतात आणि बरीच इतर कारणे आहेत. शनिवारी थोडासा बदल म्हणून पाशात्य पोशाख घालण्यावर भर असतो.  साडीची वेळ / बारी फार कमी वेळा येते, त्यामुळे प्रकर्षाने माझ्या कडे अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या मावशींना जास्त आनंद होतो आणि अर्थात पहिला प्रश्न विचारला जातो "आज काय खास?" काल पण विचारला गेला तोच प्रश्न. आमच्याकडे एक आंतर्देशीय परिषद सुरु आहे, वैविध्य विभाग (ट्रॅकस) आहेत त्यात आणि त्यातल्याच एका विभागाची जबाबदारी मला दिली गेली आहे. मी "चेअर" म्हणून काम करते आहे, त्या विभागाचे / ट्रॅक चे विद्यासन मला बहाल केले गेले आहे. छोटीशीच जबाबदारी आहे, पण म्हटलं चला त्या कामानिमित्य नेसावी साडी. नेसली, मिरवली, पण मावशींना आता हे सगळं कसं समजावून सांगू हा यक्ष प्रश्न उभा ठाकला माझ्या पुढ्यात. मी घाईत होते सकाळी त्यामुळे मी फक्त त्यांना हे सांगितलं कि आज अशी एक परिषद आहे आणि मी खुर्ची आहे. फक्त मराठीचा शब्द वापरला. मावशींना अर्थात काहीच समजले नाही. पण मग दुसऱ्या दिवशी मी त्यांना समजावून सांगतांना सर्वप्रथम "कॉन्फरन्स ट्रॅक चेअर" ह्याचा मराठीतील शब्द मी शोधून काढला, मावशींना समजेल अश्या भाषेत विचार केला आणि सरते शेवटी सांगण्याचा प्रयत्न केला. बघा, म्हणून म्हणते साडी नेसणं किती अवघड आहे, त्या सोबत काय काय परिधान करावं लागतं? अर्थात मला देखील ह्या सगळ्यात खूप मज्जा आली आणि नव्याने उमगलं कि विद्यासन हि छोटीशी का होईना पण एक जबाबदारी आहे नुसती खुर्ची नाही. ज्यांनी ह्या परिषदेत भाग घेतला आहे त्यांचं काम नीट समजून उमजून घेणे, काही उपयोगी सुचवणे आणि बरेच काही. मला हि सुवर्ण नाही तर प्लॅटिनम संधी मिळाली, दिली गेली ह्या बद्दल शतशः धन्यवाद. ह्या पुढील प्रत्येक वेळी प्रत्येकाने खुर्ची हि फक्त एक वस्तू म्हणून नाही तर संधी, जबाबदारी, सन्मान, छोटेखानी मानाचा तुरा, तपश्चर्येचं फळ असं बघावं हि नम्र विनंती.

1 टिप्पणी:

  1. With responsibility comes accountability and the 'chair' of responsibility is never easy to acquire. Although much sought after by many, only a few select deserving ones are bestowed the honour.
    And yet, the head that adorns the crown of responsibilty never rests easy..its always ' never ending miles to go before you sleep'!
    Very interestingly put across and with much humility as always.

    उत्तर द्याहटवा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...