आपल्या प्रत्येकाला हे सर्वश्रुत आहे कि प्रत्येक म्हणे १० मैलावर भाषा, बोली, पदार्थ करण्याची पद्धत, चालीरीती ई. सर्व बदलतं. आपला देशाचं असा भन्नाट आहेच, भरपूर रेलचेल पदार्थांची. त्यामुळे खूप वैविध्यता चाखायला मिळते. भाजी एकचं पण त्याची रूपे अनेक, चविष्ट चवदार अशी. प्रत्येक पद्धतीला तेवढंच महत्व कारण प्रत्येक पदार्थ करायला तेवढीच मेहेनत लागते.
माझ्या मैत्रिणीच्या घराचा एक किस्सा सांगते. आम्हा सर्व मैत्रिणींना आमच्या नागपूरची खासियत म्हणजे कोथिंबीर वडी फार अभिमानाचा जिन्नस असल्यासारखा वाटतो. अर्थात इतर पदार्थ आणि बाबी आहेत, पण तिखट आणि सर्वगुणसंप्पन अशी हि पुडाची वडी. नागपुरात देखील दोन पद्धतीने हि वडी करतात, एक म्हणजे अख्खी तळयाची आणि दुसरी म्हणजे तुकडे करून तळायचे. दुसऱ्या पद्धतीने केलं तर वेळ आणि तेल खूपच लागतं म्हणून मग सर्वत्र पहिली पद्धत जास्त प्रमाणात वापरली जाते. माझी मैत्रीण देखील अगदी मनापासून करते हि वडी, खाऊ घालते आणि तिच्या लेकरांना, कचेरीतल्या लोकांना आणि इतर सर्वांना खूप आवडते ती. तिच्या लग्नाला तब्बल २६-२७ वर्ष झालीत. इतक्या वर्षात कधी म्हणजे कधीच माझ्या मैत्रिणीच्या ह्यांनी सासूबाईंच्या हातची कोथिंबीर वडी हा विषय काढला देखील नव्हता. कधीच सासूबाईंनी खाऊ घातली तर नाहीच पण हलकासा कानावर पण नाही पडला हा विषय कधी. आज कौतुकाने नागपूर पद्धतीने केलेल्या कोथिंबीर वडी ला बघून महाराज म्हणाले कसे, "माझ्या आईने करावी हि वडी..." मग संपूर्ण थोडक्यात वर्णन केलं गेलं आई कश्या करायच्या ते. थोडसं नाही तर फार जास्त अजिब वाटलं फक्त माझ्या मैत्रिणीला नाही तर मला देखील हे ऐकून. माझ्या मैत्रिणीने संपवला तो विषय पण २७ वर्षांनी आता? हे काय नवीन? चांगलं बोलायचं नसेल तर गप्प बसावं हे देखील ह्या वयात इतक्या मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला समजू नये म्हणजे नवलंच, नाही का? असो फार छोटासा प्रसंग होता, प्रत्येक १० मैलावर सगळं बदलत ह्या आपल्या देशात तर प्रत्येक १० सेकंद / मिनिटे / तास / वर्ष अश्या काळात देखील बदल घडत असेल प्रत्येक गोष्टीतच आणि घडावाच, कारण बदल हाच तर प्रकृतीचा स्थायी नियम आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा