सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

आरसा

प्रत्येकाच्या घरीच नाही तर आताशा प्रत्येक ठिकाणी कुठल्यानं कुठल्या प्रकारचा, आकाराचा, पद्धतीचा आरसा असतोच. लोकं तो वापरतांना दिसतात पण मग पुढे काय? आरशात प्रतिबिंब बघितलं आणि? वेशभूषा, केशभूषा ई. बघितलं, ते स्वतःला चांगलं दिसतंय का नाही? प्रसंगानुरूप आहे का नाही? कुठल्या वेळा करता हि केश आणि वेशभूषा  आहे? कोणासोबत मिरवणार आहात? कधी निघणार, किती दूर जायचे आहे, कुठले वाहन, क्रतू कसा आहे? ई. च नाही तर बरेच असे प्रश्न उद्भवतात आणि उद्भवावेत. प्रत्येकवेळीचा पोषाख विविधतेने नटलेला असा हवा, साजेसा हवा. कोणालाही कुठलेही कपडे शोभून दिसतात असे नाही.  थोडासा विचार करून कृती करावी. स्वतःची काळजी घ्यावी. 

आमच्या लहानपणी असंख्य वेळा ऐकलेले वाक्य म्हणजे भांड्यात खायचं नाही, वाटी, बशी किंवा ताटली घ्या, नीट वाढून घ्या आणि शिस्तीत बसून खा. भांड्यात खाणं म्हणजे दारिद्र्याचं लक्षण, असं मानलं जायचं. अगदी तस्सेच, फाटके, उसवलेले, अगदी तोकडे किंवा उगाचच फारच कमी आकाराचे कपडे घालणे म्हणजे देखील एका प्रकारचं दारिद्र्य, नाही का? फॅशन च्या नावाखाली, ह्याने त्याने घातले म्हणून प्रत्येकाने घालावे असे नाही. ते उठून दिसले पाहिजेत. घाला कि अंगभर छान, उत्कृष्ट, नावीन्याने नटलेलं असं काही. काहीजणांना आपलीच शोभा करून घ्यायची भारीच हौस. आणि काय मिळतं हो असे चित्र विचित्र कपडे घालून? काय सिद्ध करायचं असतं? कि आम्ही किती पुढारलेले आहोत हे, वैचारीक, बौद्धिक पुढारलेले असणं देखील महत्वाचं. अगदी कधी तरी असले कपडे घालणं वेगळं आणि दररोजच हा प्रकार म्हणजे? रंग, रूप, उंची, कद-काठी बघून गरज असेल तरच असा पेहेराव करा. तुम्हीच तुमचे शिल्पकार हे लक्षात ठेवा आणि वागा. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...