शनिवार, १८ फेब्रुवारी, २०२३

सुती प्रेमळ मायाळू

आताशा देश विदेशाच्या सीमा रेषा पुसट होत चालल्या आहेत, बरेच पदार्थ, वस्तू आणि इतर गोष्टींची सर्रास देवाण घेवाण होत असते. माझ्या मते कुठल्याही गोष्टींचं आकर्षण असं राहिलंच नाही आहे आताशा कारण सगळंच मिळतं भारतात. त्यातला एक प्रकार आहे भला मोठा जाडजूड टर्किश टॉवेल. आताशा सर्वत्र वापरला जाणारा, प्रत्येक घरी दारी आणि कदाचित तो देखील सरते शेवटी कापसापासून वेगळ्या ढंगाने तय्यार होत असेल. पण तो भारदस्त असतो हे नक्की. प्रत्येकाच्या बसची बात नाही तो. मला तरी माझा भाबडा साधा सुती पंचा भावतो. वापरायला सोप्पा, धुवायला आणि सुकवायला देखील सहज, किंमत वाजवी, टिकावू आणि मस्त. भारतीय मुलींच्या बाबतीतली एक गोष्ट अशी कि केस धुतल्यावर एका वैशिष्ट्य पद्धतीने ते बांधून ठेवले जातात. ज्या वेळी कंडिशनर नावाचा प्रकार भारतात पोचला / शिरला नव्हता तो वर केसांना कंडिशन करण्याचे काम हे असे केस बांधल्यामुळे होत असे. अर्थात आधी बहुतांशी मुलींचे केस भरपूर लांबसडक आणि जाड असायचे, त्यामुळे तो पंचा तसा बांधून ठेवला कि उरलंसुरलं पाणी शोषून घेणे, केस किंचित कोरडे होण्यास मदत होत असे. एक महत्वाचा रोजनिशीचा भाग होता तो, प्रत्येक मुलीचा / स्त्रीचा. पंचा हा असा सुती प्रेमळ मायाळू असल्यामुळे ठराविक पद्धतीने त्याला डोक्यावर, किंवा डोक्याभोवती बांधणे सोप्पे जाते.  सहज विचार करा जाडजूड टर्किश टॉवेल वापरला तर जरा अवघड जाईल त्याच्या आकारमानामुळे. कधी तरी हात पुसायला वगैरे ठीक आहे, पण सर्व गूण संपन्न वगैरे असा काय हा टर्किश वाटत नाही मला आणि कित्येक भारतीय मुलींना. कितीही पुढारल्या तरी काही आपल्याच सुती प्रेमळ मायाळू वस्तू आपल्याश्या वाटतात ह्यात शंकाच नाही. उगाच नाही ह्या पंचाची मागणी खूप आहे बाजारात अजूनही. त्याचं स्थान अजूनही अढळच आहे आणि राहणार. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...