सध्याच्या पावसाळ्यात नकळत सगळेच मंदावतात आणि त्यामुळे गती संथ होते. असंच काहीसं गेले काही दिवस घडतंय. सात वाजून तीस मिनिटाला माझी गाडी सुरु होते दररोज, साडेआठ च्या कचेरीची वेळ गाठण्या करता. पावसाळ्याव्यतिरिक्त मी आठच्या आधी पोचायचे कचेरीत पण सध्या उशीर होत असल्यामुळे मी पक्के ठरवून आज सात एकोणवीसला च निघाले आणि काय सांगू क्षणभरही नाही थांबावं लागलं रस्त्यावर. शिवाय कधी नव्हे ते वैविध्य शाळेचे गणवेश बघायला मिळाले, ते रंग, त्या छटा मनमोहक होत्या. विविध वयाची शाळकरी मुलं बघून माझं आणि माझ्या मुलांचं लहानपण डोळ्यासमोर तरळून गेलं झर्रर्रकिनी, माझ्या पुण्यात आणि त्यात माझ्या भागात किती शाळा आहेत हे देखील आज नजरेच्या टप्प्यात आलं अगदी सहज खूप साऱ्या शाळेच्या बसेस बघून. हिरव्या रंगांच्या विविध छटांनी बहरून आलेली झाडं, त्या वरची अप्रतिम फुलं, बऱ्याच ठिकाणी नुकतीच उगवलेली सुगंधित फुलं ह्या सर्वांनी आजच्या दिवसाची बहरलेली मोहक सुरवात झाली. सुख म्हणजे नक्की काय असतं? अहाहा च.
https://drpreetimulay.blogspot.com/2021/05/blog-post_9.html
https://drpreetimulay.blogspot.com/2021/09/blog-post_59.html
https://drpreetimulay.blogspot.com/2021/04/blog-post.html
माझ्या तरी अवतीभोवती आणि माझ्या सानिध्यात ते सतत असतं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा