माझ्या महाविद्यालयाच्या दिवसांमध्ये बहुतांशी फक्त सलवार कमीज हा पोशाख घातला जायचा. पँट शर्ट जीन्स ह्याची फॅशन नव्हती म्हणण्यापेक्षा त्या बद्दल ठाऊक देखील नव्हते आमच्या सारख्या त्यावेळच्या मुलींना. सणावारी आईची साडी बास इतकाच काय तो आवाका आमचा. त्या वेळी धोबी चे पण एवढे फॅड नव्हते, घरीच इस्त्री केली जायची आणि ते देखील मुख्यत्वे बाबांच्या कपड्यांना कारण ते कचेरीत जायचे. मग मी पण शिकले इस्त्री करायला माझ्या आणि इतरांच्या कपड्यांना, घरीच. तो एक मस्त कार्यक्रम असायचा. त्यात मग मी कंची मारायला शिकले अर्थात बाकी मैत्रिणींकडून आणि ते आवडले पण मला, किंबहुना भावले. दिसणाऱ्या भागाला फक्त इस्त्री करायची, म्हणजे कुर्ता आणि गुढघ्यापासून खाली पाय, तेवढेच. बाकी जे दिसत नाही त्याला काय गरज इस्त्रीचे अशी माझी भावना त्यावेळी. मग मी काही वर्षांनी एका लग्नाला गेले गावाला आणि तेथे बघते तर काय ५ वारी साडी ज्यावर विराजमान होते त्या परकराला पण तेथे बहुमान मिळत होता. अहो रात्री झोपतांना घरी घालायचे ड्रेस सुद्धा इस्त्री केलेले. अबब च झालं मला. काही उमगेना असं का ते. आज कित्येक वर्षांनी माझ्या लेकीला साडी नेसायची आहे तेव्हा मी माझ्या साडी ला आणि इतर लागणाऱ्या गोष्टींना इस्त्री करतांना झपकीनी जादू झाल्यासारखं अचानक लक्षात आलं कि परकर चापचूप असेल, चोळगोळा नसेल तर त्यावर नेसलेली साडी आणि मुलगी पण झकास दिसतात. तो एक वेगळाच आत्मविश्वास येतोच आणि झळकतो ती साडी मिरवताना, जे अत्यंत गरजेचे आहे. अंतर्बाह्य सुरकुत्यारहीत, कुठलाही किंतु-परंतु न बाळगणं ह्या सारखं दुसरं जिंकणं नाहीच. आतला परकर इस्त्री केला आहे कि नाही हे कोण बघतंय हि त्यावेळची माझी निरागस भावना होती. पण नसणारा बघतोय ना? त्याला ठाऊक आहेच ना आत काय आहे ते. प्रत्येक पाऊल आत्मविश्वास पूर्व आणि दृढ विश्वासाने टाकणं मह्त्वाचंच आहे. आताशा बहुतांशी सगळेच जणं हे पाळतातच प्रकर्षाने पण नसाल तर करून बघा. फक्त इस्त्री पुरतं मर्यादित न ठेवता मनापासून बदल घडावा. फक्त चेहेरा दिसतो म्हणून सजवणे टाळा. फक्त शारीरिक स्वाथ्य नाही तर मानसिक, धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक असे पण स्वस्थ राहा आणि फरक अनुभव. जिम बरोबरीने योग आणि प्राणायाम करा. मस्त खा, आणि अंतरबाह्य स्वस्थ राहा नेहेमी करता, स्वतः करता फक्त दाखवण्या पुरते नाही.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
अग, किती छान लिहीलंय. आम्ही पण आमच्या लहानपणी अशीच इस्त्री करायचो आणि नंतर मग संपूर्ण करायला लागलो. अजूनही मी घरीच इस्त्री करते. त्यामुळे वाचतांना मला माझेच विचार मी वाचतेय असं वाटलं. खूप छान लेख आहे.
उत्तर द्याहटवाso sweet of you, thank you for your motivating words kaku. love you
उत्तर द्याहटवा