अनेकदा एक सवय आणि त्याबद्दलचे रसायन काय आहे हे कानावर पडले. ते किती खरे खोटे हे मी कधीच करत बसले नाहीच. ती सवय म्हणजे सुपारी किंवा तत्सम पदार्थ सेवन करणे. मजूर लोक म्हणजे शारीरिक कष्ट करणारे स्त्री आणि पुरुष दोघे काही तरी तोंडात ठेवून काम करतांना आढळतात. तसेच साधू जे विविध प्रार्थना स्थळी कडासने घालून पूजा पाठ करतात ते धुनी चा वापर करतात. मला खास काही त्या बद्दल ठाऊक नाही पण बहुतांशी पदार्थ तोच पण सेवनाची पद्धत बहुतेक वेगळी आहे. ह्या बद्दल कानावर असे पडले कि भूक लागू नये, किंवा भुकेची जाणीव होऊ नये किंवा बराच काळ घशात तो सुवास, स्वाद, सुगंध आणि समाधान टिकून राहावे, त्या सोबात तो व्यक्ती राहावा म्हणून ते सेवन असेल.
अगदी असाच स्वानुभव मी येथे देते आहे. मला आताशा जेव्हा अर्ध्या दिवसाचे सेशन घायचे असेल तेव्हा दररोज ची दुपारच्या जेवणाची वेळ निघून जाते. भूक लागून गडबड होऊ नये म्हणून मी दोन गोष्टी प्रकर्षाने पाळते. एक म्हणजे छोटसं तोंडात टाकण्यासारखं काही तरी जवळ ठेवतेच. आणि सकाळी सेशन ला निघण्याच्या आधी आवर्जून दोन गरमागरम भाकऱ्या, भाजी आणि ठेचा यथेच्छ फस्त करतेच. न चुकता. अगदी प्रत्येक वेळी. म्हणजे एक प्रचंड समाधान तर लाभतच पण तो सर्वोत्कृष्ट चविष्ट स्वाद ठेच्याचा घश्यात टिकतो, दरवळतो आणि मला एक अद्भुत ऊर्जा देऊन जातो ज्यामुळे आणि अर्थात सेशनला उपस्थित सर्व श्रोत्यांमुळे मग मजेत वेळ जातो, खूप मस्त शिकवता येते. अहाहा. ठेचा हि माझ्यासाठी नशा आहे. हिरव्या मिरचीचा असो किंवा लाल, कधीही चालतो, किंबहुना नागपुरी भाषेत पळतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा