"सासुरलं गेंदा फुलं ", "तेरे साथ गंदी गंदी गंदी बात..." असे बोल असलेले हिंदी चित्रपटातील गाणं प्रदर्शित झालं होतं साधारण दहा वर्षे आधी. सर्वानुमते हे गाणं म्हणजे रोमांचित संभाषण असे आहे किंवा होते. पण एवढ्यातच कसे कुणास ठाऊक पण अनेक किस्से ऐकून, वाचून, बघून नाण्याची दुसरी बाजू समजली. परवाच टीव्ही वर "कौन बनेगा करोडपती" ह्या भल्या मोठ्या नावाजलेल्या कार्यक्रमात खुले आम एक बायको नवऱ्याचे खडे बोल सुनावत होती. त्यातला नवरा म्हणतो कसा "तू कमावत नाहीस तर तुझा उपयोग काय ह्या घराला", किंवा "आई कुठे काय करते" हे पण सर्वश्रुत आहेच कि. सगळ्या स्तरात भारतात बायकोला बोलणे आहेच, अर्थात आऊट लायर्स किंवा चांगले अपवाद असतात. कोणी कबूल करतात कोणी नाही, कोणाच्या घरी असे तर कोणाच्या तसे. कोणाकडे स्पष्ट तोंडावर ऐकवतात तर कोणाकडे काही वेगळी पद्धत असेल. पण "बायको कायच काम करते" हे खूप ठिकाणी बघायला मिळते. उगाचच नाहीत बायका नोकरी करायला बाहेर पडल्यात इतक्या मोठ्या प्रमाणात. छे छे, फक्त शिक्षण घेतले म्हणून नाहीच, मुळात शिकल्याच त्या कारण अर्थकारण जास्त महत्वाचं बायको, आई आणि इतर नात्यांपेक्षा. अर्थात पुन्हा सांगते "आमच्या कडे असे का$$$$$ही नाही" अश्या म्हणाऱ्या सापडतील, पण ते कितपत खरं खोटं हा एकतर विषयच नाही, आणि ते त्यांचं ते बघू देतं.
सारखं बोलून छान तय्यार करतात ते मुलींना समाजात वावरण्यासाठी आणि खूप मस्त उंची गाठण्यासाठी. कित्ती विचारपूर्वक कृती आहे नाही. सगळे श्रेय अश्या दृष्टीने त्या बोलक्या बाहुल्यांनाच जाते.
"गंदी बात..." ह्या मागे काय दडलंय: तर मी नवरा. नवरा म्हणजे सातत्याने बोलणारच. अर्थात पुढील पिढी मध्ये हे नाही, नसावं, पण आधी होतं. सासू सासरे कित्येकदा काडी लावायचे, आणि हे पोपट बोलायचे. ह्याला गंदी बात म्हणतात. म्हणजे लग्न झालं, आता तू कधीही कानावर न पडलेले, अनपेक्षित असे ताशेरे ऐकायला तय्यार राहा असे आहे, असे दृश्य आहे अनेक कुटुंबात, मग ते शिकलेले असो, अतिउच्च विद्याविभूषित असो नाही तर अनपढ. "शुभ मंगल सावधान" असा मतितार्थ आहे ह्या गाण्याचा एका दृष्टीने. प्रत्येक लग्नात करतात सावधान पण त्याचा असा देखील अर्थ असू शकतो, काही मुलींना तर आयुष्यभर हे ऐकावं लागतं, कुठलेही स्वतंत्र दिले जात नाही किंवा त्यावर देखील एक वाचक असतो, खुप उदाहरणं आहेत आणि खूप भोगले आहे माउलींनी. असो. म्हणूनच अजून मुलींपर्यंत हे पोचावं, अजूनही वेळ गेलेली नाही असं सांगण्याकरता हे गाणं लिहिलेलं असावं आणि अश्या प्लॅटफॉर्म वर सादर केलं असावं. बोल, चाल आणि चित्रीकरण लक्षात राहण्यासारखं आहेच. तेव्हा जुन्या पिढीतल्या मुलींनो सजग व्हा. ज्यांचं सासर ह्याला अपवाद आहे त्या सुना फार भाग्यवान आहेत. आणि अशी मस्त माणसे आहेत ह्या जगात अजून.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा