सकाळी, संध्याकाळी, रात्री कुठल्याही प्रहरी चालत चालत, फेर फटका मारता मारता, दूध आणता आणता गाऊ कसे शकतात? आणि गाता गाता चालू कसे शकता? किंवा दूध कसे विकत घेऊ शकता? मला तर हे प्रश्न नेहेमीच पडतात आणि महाड आश्चर्य वाटतं. एकावेळी एक काम करूच नये, अनेक कामं करत राहावीत ह्या मताची मी पण आहे. तरी देखील माझी बोटं तोंडात जातात. आणि मुख्य म्हणजे काय गरज आहे? ते चांगलं नाही दिसत? सकाळी बघितलं कचेरीत, विद्यालयात, महाविद्यालयात आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या लोकांनी कि खूप निस्तेज वाटतं आपोआप. कधीही प्रयन्त असावा कि स्वतः साधं पण व्यवथित राहावं म्हणजे स्वतःला आणि इतर बघणाऱ्यांना ऊर्जा मिळते, आनंद होतो.
दिवसाच्या प्रत्येक वेळेनुसार वैविध्यता उपलब्ध आहे कपड्यांमध्ये. सर्वांकडे बहुतांशी इतके आहे कि ते असं सगळं घेऊच शकतात. मग जेव्हा पाहावं तेव्हा गाऊन घालून सर्वत्र भटकत का असतात बायका, आज्ज्या, काकवा, काय हे, कित्ती भोंगाळ दिसतं ते. घरी काहीही करा हो, पण दारा बाहेर पडतांना जरा तरी विचार नको का? विचित्र आणि निरुत्साही असा कारभार. काही तरी विचारपूर्वक कार्य करावे, स्वतःला आणि बघणाऱ्यांना त्याचा फरक पडतोच. प्रत्येक वेळी मल्टि टास्किंग नकोच. दररोजचं माहिती आहे कि आपल्याला बाहेर पडावं लागतं तर मग तशी तय्यारी करावी, करावीच. आपण सोसाटीईत राहतो ह्याच भान असलंच पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा