काही दिवसांपूर्वी मला माझ्या एक खास मैत्रिणीचा फोन आला. तिचा आवाज ऐकून इतकं अफाट वाटलं म्हणून सांगते कि ज्याचं नाव ते. तश्या आम्ही आपआपल्या विश्वात, रोजनिशी सांभाळता सांभाळता हवं तेव्हा भेट होतं नाही पण हो, वर्षातून एकदा भेण्याची धडपड करतोच आणि होतेच भेट. पण ती सर्व संशोधक आणि शिक्षक कुटुंबासमवेत आणि थोडक्यात. त्या नंतर कधीतरी नमस्कार चमत्कार चे मेसेज काय ते. त्यामुळे तिचा आपणहून आलेला फोन म्हणजे पर्वणीच होती. दुधात साखर किंवा चेरी ऑन केक असं झालं जेव्हा आम्ही दोघी काही वेळा का होईना एक मेकींसमोर आलो, बोललो, गप्पा झाल्या, सेल्फी ने मस्त आठवण जपली आणि मज्जा आली. "थोडक्यात गोडी" म्हणतात ना अगदी तस्से. निमित्य होते तिने मला आमंत्रण द्यायचे ते एका परीक्षेचे. मी काय एका पायावर तय्यार. गेले कि लागलीच. काय काय गम्मत केली म्हणून सांगते. एक तर मी "गाडीतून-चक्कर" वेडी मुलगी, अगदी म्हणजे अगदी कळायला लागल्या पासूनच. त्यामुळे तिच्या महाविद्यालयांत जायचे म्हणजे फारच मोठी चक्कर मला, ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत. त्यात गाडीवान सोबत, मग काय विचारात. इकडे बघू का तिकडे, ह्या पाट्या वाचू का त्या, भिंतीवर रेघाटलेली चित्रे टिपू का नवीन झालेल्या / सजलेल्या इमारती बघू असं झालं माझं, आणि हे सलग दोन दिवस. माझ्या सारखी भाग्यवान मीच. अजून काय हवंय? त्यात वेळेच्या आधी निघायची अनेक वर्षाची सवय, सध्याचे रिकामपण त्यामुळे कुठलीही घाई नाहीच, यथेच्छ अनुभवाला मी तो प्रवास. हे काय कमी होते, म्हणून एकत्र घरचे डब्बे खाल्ले, विद्यार्थिनींना परीक्षक म्हणून वैविध्य प्रश्न विचारणे किंवा उत्तरे काढून घेणे हे तर इतके म्हणजे इतके एन्जॉय केले कि विचारूच नका. धमाल आली. मग भेट झाली ती त्या संस्थेच्या संशोधनाच्या उच्च पदाधिकारी, अधिष्ठाता ह्यांच्याशी. विद्यार्थिनी फारच हुशार आणि अप्रतिम रित्या घडलेल्या अश्या दृष्टीस पडल्या. अशी संधी मिळाली होती ना कि जी प्लॅटिनम च्या पल्याड होती. तिचा मस्त उपभोग घेतला मी. फार म्हणजे फारच भन्नाट अनुभव होता तो, आणि अगदी बहरलेले असे गेले ते दिवस. "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण".
आदरणीय महर्षी कर्वे, त्यांच्या सहचारिणीला आणि वास्तू देवतेला नतमस्तक होऊन माझे दोन्ही दिवस सुरु झाले. कारण ते नसते तर हि संस्था उदयास आली नसती आणि मला तेथे यायची संधी मिळालीच नसती. त्यांच्या अफाट आणि अगाध कार्याला नमन अगदी मनःपूर्वक.
शतशः धन्यवाद ह्या निमंत्रणाबद्दल सुनीता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा